Health Tips : ऑफिसमध्ये असे करा माईंड आणि स्पाईन रिलॅक्स

ऑफिसमध्ये तासनतास डेस्कवर बसून तुम्हाला पाठ आणि मान दुखण्याचा त्रास होतो का ? आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत. यामुळे शरिराला त्वरित अराम मिळेल.
Health Tips
Health Tipsesakal

ऑफिसमध्ये तासनतास एकाच जागी, एकाच पोजीशनमध्ये बसल्यामुळे शरीरदुखी, शरीर आखडणे आणि मानसिक ताण वाढल्याचे वाटते काय? यामुळे आराम करणे आणि व्यवस्थित काम करणे कठीण होते. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी लवकर योगा किंवा व्यायाम करावा लागतो. बरेच लोक ते करतातही. मात्र अनेक जणांना वेळेअभावी इच्छा असूनही जास्त वेळ योग किंवा व्यायाम करता येत नाही

Health Tips
Health Tips : हे ५ उपाय करा आणि विसराळूपणा विसरा

आखडलेल्या शरीराला असा द्या अराम

ऑफिसमध्ये तुमच्या टेबल आणि खुर्चीसमोर बसूनही तुम्ही तुमच्या आखडलेल्या शरीराला अराम देऊ शकता. जर तुमच्या पाठ, हात आणि मानेवर ताण जाणवत असेल किंवा तासनतास बसल्यामुळे हाडांमध्ये दुखत असेल तर तुम्ही तुमची खुर्ची थोडी मागे खेचून शरीर थोडे स्ट्रेच केले पाहिजे.

Health Tips
Health Tips : डोक्यातले विचार थांबतच नाही? ४ उपाय डोकं शांत

तज्ज्ञ म्हणतात

योग तज्ज्ञ शीतल तिवारी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, तुम्ही ऑफिसमध्ये पाठदुखी आणि तणावापासून कसे मुक्त होऊ शकता. शीतल इथे सांगत आहे की, ताठर शरीर आणि मानसिक तणावातून सुटका हवी असेल तर पाठीचा कणा हलवा.

Health Tips
Health Awareness: एकटेपणा घातक ? वाढू शकतो हृदय आणि रक्तवाहिन्यांचा धोका, तज्ञांचं मत

अशा प्रकारे मूव्ह करा पाठीचा कणा

- सर्व प्रथम आपल्या खुर्चीवर सरळ बसा आणि तळपाय जमिनीवर व्यवस्थित टेकवा.

- आता तुमचे हात वरच्या दिशेने नेऊन इंटरलॉक करा आणि वरच्या दिशेला स्ट्रेच करा. थोडा वेळ याच पोजीशनमध्ये राहा.

- आता इंटरलॉक केलेले हात समोरच्या दिशेला न्या आणि ते समोर स्ट्रेच करत पाठ गोलाकार करत मागच्या बाजूला थोडी खेचा.

Health Tips
Dancing Health Benefits: रोज 30 मिनिटं मनसोक्त नाचा आणि दुखण्याला म्हणा 'अलविदा'

- आता दोन्ही हात मोकळे करा आणि मागच्या दिशेला पसरावा. मान वरच्या बाजूला स्ट्रेच करा आणि पाठ मागे खेचा.

-आता दोन्ही तळहात डेस्कवर पुढे ठेवा, खाली जमिनीकडे पाहात डोके खाली न्या आणि पाठीचा कणा सरळ स्ट्रेच करा.

- ही एक्सरसाइज दिवसातून एक किंवा दोनदा केल्याने तुमचे शरीर जास्त आखडणार नाही आणि आखडल्यास तुम्हाला त्या त्रासापासून अराम मिळेल.

Health Tips
Health: वात वाढवणारा आहार कोणता ? जेवणात टाळा ही पदार्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com