skin sakal
लाइफस्टाइल

Skin Care: कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय, जाणून घ्या

आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय कसे वापरायचे ते सांगणार आहोत.

Aishwarya Musale

कधीकधी काही लोकांच्या कपाळावर काळेपणा येऊ लागतो. अशा स्थितीत कपाळावरील काळेपणा लोकांच्या चेहऱ्याच्या सौंदर्यावरही परिणाम करतो. त्याचबरोबर अनेक महागडे पदार्थ वापरूनही काळेपणा कमी होत नाही.

म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय कसे वापरायचे ते सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही काही दिवसांतच कपाळावरील काळेपणा दूर करून गोरी त्वचा मिळवू शकता.

ओट्स-ताक स्क्रब वापरा: कपाळाचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही ओट्स आणि बटरमिल्क स्क्रब वापरू शकता. यासाठी दोन चमचे ओट्स घ्या आणि काही वेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी ओट्समध्ये दोन ते तीन चमचे ताक घाला आणि दोन्ही गोष्टी नीट मिसळून स्क्रब तयार करा. त्यानंतर हा स्क्रब चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्याला पाच मिनिटे मसाज करा. वीस मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.

दूध-हळद फेसपॅक वापरा: टॅनिंग आणि उन्हामुळे अनेक वेळा कपाळावर काळेपणा येतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही दूध-हळद फेस पॅक वापरू शकता. यासाठी अर्धा चमचा हळद घेऊन त्यात थोडे दूध मिसळून पेस्ट बनवा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटे असेच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

मध-लिंबाचा रस मदत करेल: कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही मध आणि लिंबाचा रस देखील वापरू शकता. यासाठी एक चमचा मध घ्या आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस मिसळा. नंतर हे मिश्रण कपाळावर लावा आणि अर्धा तास असेच राहू द्या. यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा.

बेसन आणि हळदीचा होईल चांगला उपयोग : कपाळावरील काळेपणा दूर करण्यासाठी बेसन आणि हळदीचा फेस मास्कही प्रभावी ठरू शकतो. यासाठी दोन चमचे बेसन घ्या आणि त्यात अर्धा चमचा हळद आणि थोडे कच्चे दूध मिसळा. नंतर चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे असेच राहू द्या. यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.

काकडीचा वापर करा: त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठीही तुम्ही काकडीचा वापर करू शकता. यासाठी काकडीचे गोल काप करावेत. नंतर हलक्या हातांनी दररोज पाच मिनिटे कपाळावर हलक्या हाताने घासून घ्या. यानेही कपाळावरील काळेपणा हळूहळू दूर होऊ लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT