pomegranate  sakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : सुंदर त्वचेसाठी ट्राय करा डाळिंबाचा फेस पॅक, त्वचा होईल मुलायम आणि चमकदार

डाळिंबामध्ये अनेक पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसू शकते.

Aishwarya Musale

उन्हाळ्यात, सूर्यप्रकाश, धूळ आणि मातीमुळे त्वचा खूप रफ आणि ड्राय होते, ज्याच्या काळजीसाठी लोक विविध केमिकल बेस्ड ब्यूटी प्रोडक्ट्स वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही डाळिंबाच्या मदतीने घरच्या घरी त्वचेची चांगली काळजी घेऊ शकता. स्किन केअरमध्ये त्वचेच्या काळजीसाठी डाळिंबाचा वापर तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता ते आम्ही तुम्हला सांगतो.

फेस क्लीन करा: स्किन केअरच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता करावी, त्यासाठी डाळिंबाचा वापर फेस क्लिन्जर म्हणून करा. यासाठी सात ते आठ चमचे डाळिंबाचा रस घेऊन त्यात दहा ते पंधरा थेंब पाणी मिसळून चेहऱ्याला लावा. त्यानंतर चेहर्‍याला सर्कुलर मोशनने पाच मिनिटे मसाज करा आणि चेहरा साध्या पाण्याने धुवा. अशा प्रकारे चेहऱ्यावरील घाण निघून चेहरा स्वच्छ होईल.

फेस स्क्रब वापरा: डाळिंबाचा नैसर्गिक फेस स्क्रब बनवण्यासाठी प्रथम चार चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यानंतर त्यात चार चमचे डाळिंबाचा रस मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावून दोन ते तीन मिनिटांसाठी हलक्या हातांनी फेस स्क्रबिंग करा. यानंतर चेहरा सामान्य पाण्याने धुवा. यामुळे त्वचेच्या डेड स्किन निघून जातील आणि त्वचा चमकू लागेल.

फेस मास्क बनवा: त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचा फेस मास्क देखील बनवू शकता. यासाठी एक चमचा कोको पावडरमध्ये एक किंवा दोन चमचे डाळिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावून कोरडे होऊ द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT