लाइफस्टाइल

70 टक्के महिला अत्याचाराविरोधात राहतात गप्प, अभ्यासात दावा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार ही माहिती मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

स्त्रिया खूप सहनशील असतात, त्या शांतपणे अनेक गोष्टी सहन करतात, असे मानले जाते. भारतात तर अशा सहनशील स्त्रिया पूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात आपल्या आजूबाजूला पहायला मिळतात, काही जणींकडे बघून त्यांना इतक्या समस्या असतील असे वाटतच नाही. आपल्या समाजात सुरुवातीपासूनच स्त्रियांना कमी बोलायला दिले जाते.

NFHS-5 म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, देशातील 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 70 टक्के स्त्रिया स्वतःवर झालेल्या अत्याचारांबद्दल कधीच बोलच नाहीत. तसेच त्याविरोधात कोणाचीही मदत घेत नाहीत. या अहवलानुसार देशातील आसाम, बिहार, मणिपुर, सिक्कीम आणि जम्मू-काश्मीर या राज्यामध्ये हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांची संख्या 80 टक्क्यांहून जास्त आहे. तर, त्रिपुरा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येक अत्याचार मूकपणे सहन करणाऱ्या महिलांची संख्या ७० टक्क्यांहून जास्त आहे.

मदत मागणाऱ्या महिला

अत्याचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांची संख्या अत्यंत निराशाजनक आहे. NFHS-5 नुसार देशातील फक्त १० टक्के महिलाच आपल्यावर झालेल्या अन्याविरोधात दुसऱ्यांची मदत घेतात. आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, हिमाचल प्रदेश, मणिपुर, नागालॅंड आणि जम्मू काश्मीर ही राज्य आणि केद्र शासित प्रदेशात १० टक्क्यापेक्षा कमी महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्या मदतीसाठी त्यांचे कुटुंबीय, शेजारी, पोलिस, वकील आणि धार्मिक नेत्यांची मदत घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मोदी कुठेही जाणार नाहीत’ हा अहंकार! कॉकरोच जनता पार्टीचा भाजपवर हल्लाबोल; स्मृती इराणींची 'ती' पोस्ट शेअर करत टीका...

Reliance Share Price: रिलायन्सचा शेअर 7% वाढला! गुंतवणूकदारांची तासाभरात 1 लाख कोटींची कमाई; कारण काय? शेअर आणखी वाढणार?

Sangli DCC Bank : जत 'अ' सोसायटी गटात 100 टक्के मतदान; आमदार पडळकरांची प्रतिष्ठा पणाला, गोपनीयतेच्या भंगावरून सावंत समर्थकांचा आक्षेप, किरकोळ वाद

Latest Marathi News Live Update : पुण्यात मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी, गंगाधाम चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा

India Playing XI vs NZ 1st ODI: श्रेयस अय्यर OUT, ऋतुराज गायकवाड IN! ट्वेंटी-२० गाजवणारा थेट वन डे संघात; पहिल्या सामन्यासाठी भारताचे तगडे ११ शिलेदार...

SCROLL FOR NEXT