72 year old german man shows 1 body part left he hasnt tattooed after covering 98 percent 
लाइफस्टाइल

डोक्यापासून पायापर्यंत तब्बल ८६ टॅटू; ७२ वर्षीय व्यक्तीचा क्रेझीनेसपणा!

शर्वरी जोशी

सध्याच्या काळात टॅटू हा फॅशनचा एक भाग झाला आहे. त्यामुळे अगदी तरुणाईपासून ते ६० च्या आसपास असलेल्या नागरिकांपर्यंत अनेकांमध्ये टॅटूची क्रेझ असल्याचं दिसून येतं. अनेक जण काही खास कारणासाठी टॅटू काढतात. तर, काही जण केवळ आवड किंवा ट्रेण्ड असल्यामुळे काढतात. यात अनेक जण असेही पाहायला मिळतात जे या ट्रेण्डच्या आहारी गेले आहेत. बऱ्याचशा व्यक्ती अशा आहेत, ज्यांनी डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या डिझाइनचे टॅटू गोंदवून घेतले आहेत. यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांचादेखील समावेश आहे. अनेक स्त्रियादेखील हौशीने टॅटू गोंदवून घेतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीची चर्चा रंगली आहे. वयाची सत्तरी ओलांडलेल्या एका व्यक्तीला टॅटूची तुफान आवड असून त्याने चक्क ८६ टॅटू काढले आहेत. विशेष म्हणजे ही व्यक्ती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचसोबत त्यांचे काही फोटोदेखील प्रचंड व्हायरल झाला आहे.

जर्मनीमध्ये राहणारे ७२ वर्षीय वोल्फगांग किरश्च यांना टॅटूची विशेष आवड असून त्यांनी जवळपास ९८ टक्के टॅटू गोंदवून घेतले आहेत. वयाच्या ४६ व्या वर्षी पहिला टॅटू काढणाऱ्या वोल्फगांग यांच्या शरीरावर एकूण ८६ टॅटू आहेत. विशेष म्हणजे त्यांनी डोक्यापासून ते पायांपर्यंत विविध डिझाइनचे टॅटू काढले आहेत.

चेहऱ्यावरही टॅटू काढणारे वोल्फगांग यांनी केवळ तळव्यावर टॅटू काढला नसून त्यांच्या शरीरावरील टॅटूची संख्या पाहता ते जर्मनीमधील सर्वाधिक टॅटू काढणारे व्यक्ती ठरले आहेत. वोल्फगांग यांना हे टॅटू काढण्यासाठी जवळपास ७२० तास लागले आहेत. तर या टॅटूसाठी त्यांनी २१ लाख ७३ हजार रुपये खर्च केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT