actress ankita panvelkar
actress ankita panvelkar sakal
लाइफस्टाइल

स्थित्यंतराचा अन् आनंदाचाही काळ

अंकिता पनवेलकर, अभिनेत्री

आईपणाची चाहूल लागली, तेव्हा माझी कुठली मालिका किंवा इतर कोणता प्रोजेक्ट सुरू नव्हता; पण मी एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते. ती स्पर्धा पूर्ण झाली. मी अंतिम १५ स्पर्धकांमध्ये गेले. त्याच्यानंतर अंतिम पाच स्पर्धकांमध्ये आले. ही स्पर्धा मी जिंकली नाही; पण ती स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर मला एके दिवशी कळलं, की मी प्रेग्नंट आहे.

मी गरोदर होते, तेव्हा सुदैवानं माझ्या हातात कुठलाच प्रोजेक्ट नव्हता. मी अभिनय क्षेत्रात येण्यासाठी नुकतीच सुरुवात केली होती. प्रेग्नंट असल्यामुळे बाहेर जाऊन ऑडिशन देण्याचा संबंधही राहिला नव्हता; पण श्रावीचा जन्म झाल्यानंतर मला कामं मिळत गेली. एका पॉइंटला तडजोड म्हणजे आम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावे लागले.

कारण दररोजचा पुणे-मुंबई-पुणे प्रवास झेपत नव्हता आणि प्रवास केला तरी त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसत होते. त्यातच कम्फर्टनं यायचं म्हटलं तर दररोज खूप पैसे खर्च होत असत. त्याकाळी तेवढे पैसे दररोज प्रवासासाठी खर्च करणं योग्य नव्हतं. त्यामुळे रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतुकीनं आम्ही प्रवास करायचो. मात्र, दररोज प्रवास करणं कंटाळवाणे झाले. त्यामुळे आम्ही मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

श्रावी एक वर्षाची नसतानाच मी काम सुरू केलं होतं. त्यामुळे आमच्या दोघींच्या नात्यात खूपच अंतर पडल्यासारखं जाणवलं. ती पुण्यात आणि मी मुंबईत. त्यामुळे वेळ मिळाला की मी लगेच पुण्यात येत असे. त्यासाठी रात्रीच्या वेळी, तर कधी पहाटेही प्रवास करावा लागत असे.

कधी लवकर पॅकअप झालं, तर लगेचच पुण्याला येण्यासाठी निघत असे. त्यामुळे दगदग व्हायची; पण दुसरा पर्याय नसायचा. श्रावीला मुंबईत सांभाळायला कुणी नसल्यानं तिला मी आणूही शकत नव्हते. त्यासाठी मला नक्कीच तडजोड करावी लागली.

आई होण्याची चाहूल लागली, तेव्हा मी अभिनय क्षेत्रातच काम करायचं ठरवलं होतं. मुख्य म्हणजे मला माझ्या घरच्यांचा खूप पाठिंबा होता. माहेरचेच नव्हे, तर सासरची मंडळीही खूप सपोर्ट करत असत. मला आठवतंय, मी प्रेग्नंट होते, तेव्हा माझ्या सासूबाई म्हणाल्या, ‘ठीक आहे. आता नऊ महिने आपण काही करू शकत नाही; पण मूल आठ महिन्यांचं झालं, की तू लगेच कामं शोधायला सुरुवात कर.’ माहेरहून मुलींना नेहमीच पाठिंबा असतो; पण सासरकडून इतका सपोर्ट मिळणं फार महत्त्वाचं आहे. हा पाठिंबा मला आजपर्यंत मिळत आहे.

आई झाल्यावर पहिले आठ ते दहा महिने काही टेन्शन नव्हतं, कारण हातात काम नव्हतं. त्यानंतर माझ्या हातात एक नाटक आलं होतं. चार दिवसांचा नागपूर दौरा होता. त्या वेळी श्रावी बाहेरचं काही पित नव्हती. आता काय करायचं, असा प्रश्न मला पडला होता. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, ‘‘तू निश्चिंतपणे जा. श्रावीची काळजी मी घेते.’’ हा दिलासा मिळाल्यानंतर मी नागपूरला गेले.

माझं अभिनयातील करिअर खऱ्या अर्थानं मुलगी झाल्यानंतर सुरू झालं. मला कामंही त्यानंतर मिळत गेली. पुणे-मुंबई प्रवास करणं माझ्यासाठी फार अवघड जायचं. मी श्रावीला मिस करायचे. श्रावी बिल्कूल रडकी नव्हती. मी  मुंबईला चालले आहे म्हणून ती खूप रडत बसेल, असं होत नव्हतं; पण कधी कधी तिच्या डोळ्यांमध्ये पाणी येत असे. तिला सोडून जाताना माझा पाय निघत नसे. त्या वेळी माझी तारांबळ उडत असे.

इतक्या गोड मुलीला बाजूला ठेवून आपल्याला जायचं आहे, हेच मनाला पटत नव्हतं. आपण काही वाईट तर करत नाही ना?, आपण आपल्या स्वार्थासाठी तर हे करत नाही ना?, आपण निर्णय चुकीचा घेतला आहे का?, असे अनेक प्रश्न उभे राहत असत; पण शेवटी ‘शो मस्ट, गो ऑन’ असं म्हणत मला निघावं लागत असे.

करिअरिस्ट मुलींसाठी टिप्स

  • आई होण्याचा निर्णय घेताना स्वतःची मानसिक तयारी करा. कारण कधी घरचे, कधी पती तर कधी बाहेरचे लोक दबाव आणत असतात. मात्र, तुमच्या मनाची तयारी असेल तरच आई होण्याचा निर्णय घ्या. कारण ही खूप स्पेशल गोष्ट आहे. यानंतर आपलं आयुष्य खूप बदलून जातं.

  • आई झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असला, कितीही महत्त्वाची जबाबदारी असली, तरी कुटुंबाला आणि मुलांना प्राधान्य दिलंच पाहिजे. त्यासाठी काही तडजोड करावी लागली तरी चालेल.

  • आई झाल्यानंतर परिस्थितीमध्ये बदल होत असतो. शारीरिक बदलही खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे झोप वेळेवर न होणं, खाण्यापिण्याच्या वेळेमध्ये बदल होणं, त्यातच आपल्यापासून आपली मुलं दूर राहत असतील तर मानसिक त्रासही निश्चितच होतो. अशा वेळी आपल्यामधील सकारात्मकता कधीच कमी होऊ देऊ नका. 

  • कितीही त्रास होत असेल किंवा कितीही अडचणी निर्माण होत असतील तरी अशा वेळी मोठा श्वास घ्या आणि स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT