Vision Syndrome esakal
लाइफस्टाइल

Vision Syndrome: योगा क्विन शिल्पाचा हा सोपा व्यायाम दूर करेल तुमचा कंप्युटर व्हिजन सिंड्रोम

व्हिजन सिंड्रोम असणाऱ्यांसाठी हा व्यायाम फायदेदायी ठरणारा आहे

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकताच तिच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने डोळे निरोगी ठेवण्याबाबतचा एक सोपा व्यायाम सांगितलाय. व्हिजन सिंड्रोम असणाऱ्यांसाठी हा व्यायाम फायदेदायी ठरणारा आहे.

अलीकडे आपली अर्ध्यापेश्रक्षा जास्त कामे ऑनलाईन चाचली असल्याने प्रत्येकाचाच स्क्रिन टायमिंग वाढलाय. मोबाईल, लॅपटॉपपुढे आपण जास्तीत जास्त वेळ घालवत असल्याने डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होता. सतत स्क्रिनपुढे राहिल्यामुळे डोळ्यांना जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळे कोरडे पडणे, डोळे पाणावणे यासारख्या समस्या सामान्य होत आहेत. डोळ्यांशी संबंधित या समस्यांना सामान्यतः 'कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' म्हणतात.

विज्ञान तंत्रज्ञान प्रगती झाली आणि आपली जवळपास सगळीच कामे ऑनलाईन स्क्रिनपुढे व्हायला लागली. त्यामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्याही वाढायला लागल्या. योगा क्विन शिल्पाने डोळे निरोगी ठेवण्यासाठी सोपा उपाय तिच्या इंस्ट्राग्राम व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलाय.

शिल्पाने तिच्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे की, आपण तंत्रज्ञानाला पूर्णपणे टाळू शकत नाही. मात्र डोळ्यांची योग्य निगा राखण्यासाठी नक्कीच उपाय करू शकतो. तुम्ही नेत्र योगाचा सराव करत डोळ्यांची दृष्टी सुधारण्याचा प्रयत्न करू शकता.

कंप्युटर व्हिजन टाळण्यासाठी हे उपाय करा

तुम्ही एका जागी बसा. आता तुमचे डोळे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवा. हे 5-6 वेळा करा. त्यानंतर डोळे गोलाकार आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हलवा. आता डोळे वर आणि नंतर खाली करा. मग डोळे बंद करा. (Yoga) दोन्ही तळवे चेहऱ्यासमोर आणा, थोडा वेळ थांबा आणि नंतर सोडा. पापण्या झपाट्याने मिचकावा आणि नंतर डोळे बंद करा आणि उघडा. हे सर्व डोळ्यांचे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागतील. हे व्यायाम करण्यासाठी, तुम्ही शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT