Tabu Beauty Secret esakal
लाइफस्टाइल

Tabu Beauty Secret: तब्बू 52 वर्षांची अजिबात वाटत नाही! कारण ती खाते 'या' पाच गोष्टी

ती तरुण दिसण्यासाठी डाएटमध्ये कुठल्या पाच गोष्टी खाते ते आपण जाणून घेऊया

सकाळ ऑनलाईन टीम

Beauty Tips: विशिष्ट काळानंतर महिलांना आता आपल्याला म्हातारपण येतंय असं वाटायला लागतं. याने त्यांच्या मेंटल आणि फिजीकल हेल्थवरही परिणाम होतो. अनेक महिलांना चाळीशीनंतर वेगवेगळे आजार उद्भवतात. अभिनेत्री तब्बूला बघाल तर तिने पन्नाशी कधीच पार केली मात्र आजही तरुण आणि सुंदर दिसते. ती तरुण दिसण्यासाठी डाएटमध्ये कुठल्या पाच गोष्टी खाते ते आपण जाणून घेऊया.

या पाच गोष्टी तुम्हाला तुमच्या किचमध्येच सापडेल. त्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही.

कांदा - कांद्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. ते आपल्या बॉडीला कँसरपासून वाचवतात. जर तुम्ही रोज जेवणात कांदा घेतला तर तुमचा मेटाबोलिझम पावर वाढेल. तसेच हाय ब्लड प्रेशर, इमडायजेशन यांसारखे आजार दूर होतील.

आपल्या सर्वांना माहिती आहे की आंबट फळे खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका कमी होतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे हृदय आणि कर्करोगाच्या आजारांपासून आपले संरक्षण करतात. (Actress)

ज्या महिला शुगर फ्री डार्क चॉकलेट खातात, त्यांच्या शरीराला फ्लेव्होनॉइड्स मिळतात, जे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि मधुमेहापासून संरक्षण करतात. म्हणूनच ते नियमितपणे खाल्ले पाहिजे.

हिरव्या भाज्या खाणे सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. 30 पेक्षा जास्त वयाच्या महिलांनी त्या खाल्ल्या पाहिजेत कारण त्यांच्या शरीराला लोह, व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट, कॅल्शियम, बीटा कॅरोटीन आणि झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक तत्व मिळतील. यामुळे त्यांची दृष्टी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण होईल, तसेच त्यांची हाडे मजबूत होतील. (Beauty)

वयाची तिशी उलटलेल्या महिलांनी अंडी नक्की खावी. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. तसेच यात गुड फॅट आणि व्हिटॅमिनही असतं. यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT