aishwarya shewale and laxmi dasarwar two women fight against child marriage  Sakal
लाइफस्टाइल

Child Marriage : बालविवाह रोखणाऱ्या रणरागिणी

मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागृती वाढली, तरी जबाबदारीतून मुक्त होण्याच्या नावाखाली बालविवाहांचे प्रमाण आजही कायम आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात हळूहळू जनजागृती वाढत आहे.

स्वप्नील भालेराव

किनवट : मुलींच्या शिक्षणाविषयी पालकांमध्ये जागृती वाढली, तरी जबाबदारीतून मुक्त होण्याच्या नावाखाली बालविवाहांचे प्रमाण आजही कायम आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी समाजात हळूहळू जनजागृती वाढत आहे.

मुलीचे लग्न ठरविताना जरा वयाचाही विचार करावा, असे म्हणण्याची वेळ आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांवर आली आहे. त्यामुळे आदिवासी किनवट तालुक्यात नुकतीच बालविवाहाची धक्कादायक घटना घडली.

ता. २८ फेब्रुवारीला घोटी येथील शिवाजी राजे गार्डनमध्ये सकाळी दहाला विवाह होणार असल्याची माहिती एका तरुण सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली. परंतु, वधूचे वय कमी असल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यांनी १०९८ चाइल्डलाइफ सेंटरला कॉल करून इत्यंभूत माहिती दिली.

चाइल्डलाइफ सेंटरच्या पर्यवेक्षिका ऐश्वर्या दिनकर शेवाळे, प्रकल्प पर्यवेक्षिका रेखा गुलसकर व केस वर्कर दीपाली दत्ता हिंगोले यांनी किनवट पोलिस स्टेशनला तत्काळ संपर्क साधून त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली.

नांदेडला जिल्ह्याच्या ठिकाणी त्या राहात असल्याकारणाने त्यांना किनवटला पोचण्यासाठी उशीर होणार होता, हे लक्षात आल्याने त्यांनी किनवट शहरातील अंगणवाडी सेविका लक्ष्मी रमेश दासरवार, मोसीन आमदन चाऊस, प्रेमिला पांडुरंग हटकर, नंदा देवराव येमुलवार यांना घटनास्थळी जाऊन बालविवाह रोखण्याचे निर्देश दिले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे समन्वय साधत होत्या.

धोका पत्कारून केली हिंमत

एकीकडे लग्नाची सर्व तयारी सुरू असताना पोलिस आणि अंगणवाडी सेविकांना पाहून वऱ्हाडी मंडळी अवाक् झाले. मुलगी १० वीत असून १६ वर्षांची अल्पवयीन असल्याची त्यांनी दोन्ही कुटुंबीयांना माहिती दिली आणि हे लग्न बेकायदेशीर असल्याने थांबविण्याची विनंती केली. विवाह रोखल्यामुळे त्यांच्या जिवाचा धोका पत्करावा लागला.

हा धोका पत्करून त्यांनी बालविवाह रोखण्याचे अग्निदिव्य काम केले. चाइल्डलाइफ सेंटरच्या पर्यवेक्षिका ऐश्वर्या शेवाळे व केस वर्कर दीपाली इंगोले यांनी सप्टेंबर ते फेब्रुवारी या ६ महिन्यांत १२ बालविवाह रोखले आहेत. खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनानिमित्त त्यांच्या कार्याला सलाम...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake in Delhi: तब्बल १० सेकंद राजधानी हालली...दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये भूकंपाचे मोठे धक्के

Indian Womens Hockey: अनुभवी हॉकी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे घसरण : हरेंद्र सिंग

Horoscope Prediction Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला गजकेसरी अन् मालव्य राजयोग, मिथुनसह या राशींना धनलाभ आणि सुखाची प्राप्ती!

Stock Market Opening: सेन्सेक्सची 122 अंकांच्या वाढीसह सुरुवात; मेटल क्षेत्रात तेजी, कोणते शेअर्स घसरले?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

SCROLL FOR NEXT