Wine Fact esakal
लाइफस्टाइल

Akhad Special Wine Fact : फ्रिजरमध्ये ठेवूनही वाईन कधी गोठत नाही; का, माहितीये?

Wine Fact : वाईन बद्दलची ही एक गोष्ट बऱ्याच लोकांना माहितच नसते.

धनश्री भावसार-बगाडे

Wine Naver Freeze Reason In Marathi : गटारी अमावस्या दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमी, आखाड प्रेमी अशा सर्वांचेच आखाड पार्टीचे प्लॅनिंग जोरदार असेल. हल्ली पार्टी म्हटली की, दारू शिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. मग ती पार्टी आनंदात असो किंवा दुःखात किंवा हँगआऊट असो. फार कमी लोक असतात जे दारू पित नाहीत.

Wine Fact

पण एक वर्ग असाही आहे जे इतर कोणताही मद्यप्रकार घेत नाहीत. पण वाईन मात्र घेतात. त्यांचं म्हणणं असतं की, वाईन मध्ये फार अल्कोहल नसतं. पण हा मात्र गैर समज आहे. वाईन मध्ये जास्त मात्रेत अल्कोहल असतं असं काही जाणकारांचं मत आहे.

Wine Fact

शिवाय ही गोष्ट पण अनेकांना माहित नसते की, वाईन थंड ठिकाणी सुद्धा गोठत नाही. अगदी थंड प्रदेशातही घेऊन गेलात तरी ती गोठत नाही. किंवा अगदी डीप फ्रिजमध्ये ठेवलं तरी ते गोठत नाही.

Wine Fact

कोणताही द्रव पदार्थ फ्रिजरमध्ये ठेवला की, गोठतो. पण मग वाईनच का गोठत नाही? त्यात असे कोणते घटत असतात? याविषयीचं विज्ञान काय आहे जाणून घेऊया.

कोणताही द्रव पदार्थाचे गोठणे त्याच्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते. विशेषतः अल्कोहोलमध्ये अनेक सेंद्रिय रेणू असतात जे त्याला गोठू देत नाहीत.

Wine Fact

द्रव गोठते कसे?

प्रत्येक द्रवात त्याच्या आत एक ऊर्जा असते. ती सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असते. जेव्हा द्रवाच्या सभोवतालचे तापमान कमी होते तेव्हा त्याची आंतरीक ऊर्जा देखील कमी होते. जेव्हा ती शून्यावर पोहचते तेव्हा ते एकमेकांपासून काही अंतरावर असणारे रेणू एकमेकांना चिकटतात. ज्यामुळे त्यांचे घन म्हणजेच सॉलीडमध्ये रुपांतर होते.

Wine Fact

फ्रीजींग पॉइंटवर जर वाईन गोठवायची असेल तर ती ११४ डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानात ठेवावी लागेल. जर तुम्ही विचार करत असाल की, पाणी आणि अल्कोहोल दोन्ही द्रव पदार्थ असूनही गोठणबिंदूमध्ये एवढा फरक कसा? पण पदार्थ गोठण्याचा बिंदू त्यांच्या रेणूंवर अवलंबून असतो.

Wine Fact

घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या फ्रीजचं तापमान ० ते ३ अंश सेल्सिअस असते. डीप फ्रीजरचं तापणान -१० ते -३० अंश सेल्सिअस असतं. त्यामुळे फ्रीजरमध्ये अल्कोहोल कधीही गोठत नाही. जर वाईन गोठवायची असेल तर -११४ अंश सेल्सिअसला जाईल असं फ्रीज आणावं लागेल. पण असा फ्रीज अजून बनलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : सरकारच काय, सरकारचा बाप जरी आला तरी आरक्षण घेणार, तेही ओबीसीतूनच....मनोज जरांगेंचा निर्धार

प्रेमानंद महाराज बालक, संस्कृत श्लोकांचा अर्थ सांगावा; जगद्गुरू रामभद्राचार्यांचं थेट आव्हान

सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! मेट्रोच्या वेळेत बदल, पहिली ट्रेन 'या' वेळेत सुटणार

Weekly Career Horoscope: गजकेसरी योगामुळे 'या' राशींच्या जीवनात येणार आहे आर्थिक समृद्धी आणि कामातील जबरदस्त प्रगती!

Manoj Jarange: ओबीसींनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही, आम्ही जातीवादी...; मनोज जरांगे कडाडले, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT