Akshaya Tritiya 2024 esakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने काढा फुलांच्या अन् स्वस्तिकच्या सोप्या रांगोळ्या, अंगणाला येईल शोभा..!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीया यंदा १० मे (शुक्रवारी) साजरी केली जाणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी अनेक शुभ कार्ये पार पाडली जातात. नव्या घरात गृहप्रवेश केला जातो, नवीन वाहन खरेदी केली जाते. यासोबतच इतर अनेक कामांना सुरूवात केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

अक्षय तृतीया हा सण यंदा १० मे (शुक्रवारी) साजरा केला जाणार आहे. या शुभ दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू, कुबेर यांची खास पूजा केली जाते. या दिवशी घराची सजावट केली जाते आणि घराच्या अंगणात आणि देवाजवळ सुंदर रांगोळी काढली जाते.

कमळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फूल आहे. कमळ हे फूल हिंदू धर्मात अतिशय शुभ मानले जाते. यंदाच्या अक्षय तृतीयेला अंगणात रांगोळ्या काढण्यासाठी कमळाच्या सुंदर डिझाईन्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या सोप्या आणि सुंदर रांगोळ्यां कशा काढायच्या? चला तर मग जाणून घेऊयात त्याबद्दल.

कमळ रांगोळी डिझाईन

अक्षय तृतीयेच्या खास प्रसंगी तुम्ही घराच्या अंगणात किंवा देवघराजवळ ही कमळाची रांगोळी काढू शकता. ही रांगोळी काढण्यासाठी चमचा, फेविकॉलची बॉटल, काडीपेटीची काडी आणि खडूची मदत घ्यावी लागेल.

  • सर्वात आधी खडूच्या मदतीने कमळाचे फूल आणि कलश काढा.

  • आता ही डिझाईन काढल्यानंतर कमळामध्ये गुलाबी रंग भरा.

  • आता कलश आणि नारळाला काळ्या रंगाची बॉर्डर करा.

  • आता तुमच्या आवडीचे कलर त्यात भरा.

  • या रांगोळीला अधिक आकर्षक लूक देण्यासाठी कमळाच्या खाली अर्धचंद्राच्या आकारात वर्तुळ काढा.

  • त्यानंतर, तुमच्या आवडीचे आकर्षक रंग भरा आणि त्याला मोरपिशांची सुंदर डिझाईन काढून त्यात रंग भरा.

स्वास्तिक अन् कलशाची रांगोळी

स्वास्तिक आणि कलशाच्या डिझाईनची ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे. या प्रकारची रांगोळी तुम्ही घराच्या अंगणात किंवा देवघरासमोर ही काढू शकता.

ही रांगोळी काढण्यासाठी सर्वात आधी खडूच्या मदतीने कलश काढून घ्या. आता त्यावर पानांची आणि नारळाची डिझाईन काढा.

आता या डिझाईनला लाल रंगाची बॉर्डर काढून घ्या आणि कलश सजवण्यासाठी तुमच्या आवडीची त्यावर डिझाईन काढा.

कलशची डिझाईन पूर्ण झाल्यावर त्यात रंग भरा आणि त्याच्या शेजारी २ स्वास्तिक काढा.

त्यानंतर, खाली तुमच्या आवडीच्या फुलांची डिझाईन काढा आणि त्यात आकर्षक रंग भरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT