Almond Day 2023 esakal
लाइफस्टाइल

Almond Day 2023 : बदाम भिजवलेले खाणे चांगले की सुके? जाणून घ्या कसे मिळतील जास्त फायदे!

बदाम खाल्याने खरंच वजन कमी होतं का?

सकाळ डिजिटल टीम

डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ नेहमी सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. त्यातही बदाम खाण्याकडे जास्त भर द्या असेही सांगतात. त्याला कारण आहे बदामामध्ये असलेले पोषक घटक. होय, बदामामध्ये पोषक घटक आणि जीवनसत्वांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या प्रकृती उत्तम ठेवण्यात मदत करते.

आकारानं छोट्या असलेल्या या सुकामेव्याचे शरीराला होणारे फायदे आश्चर्यकारक आहेत. बदामामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि ओमेगा ३ हे घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, अँटी-ऑक्सिडंट्सही असतात. शिवाय कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते. 

बदामाबाबत काही गोंधळात टाकणारे प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे, बदाम भिजवून खावेत की तसेच, भिजवलेल्या बदामाची सालं काढायची की साल न काढता तसेच बदाम खायचे, किंवा दररोज किती बदाम खावे, याच प्रश्नांची आज उत्तरे पाहुयात. कारण आज आहे राष्ट्रीय बदाम दिन.

बदाम भिजवलेले खावेत?

बदाम हा प्रोटीन्सचा अतिशय उत्तम स्त्राेत आहे. त्यामुळे शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून  काढण्यासाठी भिजवलेले बदाम नियमितपणे खावेत असा सल्ला डॉक्टर देतात. बदाम इतर कोणत्याही सुकामेव्यापेक्षा पचायला कठीण आहेत. त्यामुळे बदाम नेहमी भिजवूनच खावेत, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

साल काढून खावेत?

भिजवलेले बदाम सोलून खावेत की तसेच असा प्रश्न तूम्हालाही पडला असेल. तर डॉक्टर सांगतात की, बदामाच्या सालांमध्ये टॅनिज ऍन्ड फॅटीक ऍसिड सारखे ऍन्टी न्युट्रीशन्स असतात. जे पचायला कठीण असतात. याशिवाय हे घटक बदामातले पौष्टिक घटक शरीरात मिसळण्यास अडथळा आणतात. त्यामुळे भिजवलेले बदाम नेहमी सालं काढूनच खावीत.

एकावेळी किती बदाम खावेत?

बदाम खाणे तूम्हाला आवडत असले तरी त्याचा अतिरेक करणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दररोज ५ ते १० भिजवलेले बदाम तूम्ही सकाळी खाऊ शकता.

बदाम खाण्याचे फायदे

- पचनप्रक्रिया सुधारते. बदाम हे आरोग्यासाठी सर्वात पोषक आणि उत्तम आहार आहे. बदामामधील मोनोसॅच्युरेटेड फॅट्स भूकेवर नियंत्रण आणतात. आपल्याला वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

- हृदय आणि मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे बदामाचे सेवन करावे. यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

- बदामामुळे ट्रायग्लिसराइडचा स्तर देखील कमी होण्यात मदत मिळते. हृदयरोगी, मधुमेहींसाठी बदाम हा उत्तम पर्याय आहे.

- डाएटमध्ये बदामाचा समावेश केला तर मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारांसह अन्य गंभीर स्वरूपाचे आजार दूर राहण्यास मदत होते.

- बदामामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.

- बदामामध्ये फायबर, व्हिटॅमिन ई, ओमेगा ३, ओमेगा ६, मॅग्नॅशियम, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, झिंक हे घटक मोठ्या प्रमाणावर असतात.

- स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त रक्तस्त्राव होत असल्यास त्यांनी महिनाभर नियमितपणे भिजवलेले बदाम खावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT