Amla Hair Packs  esakal
लाइफस्टाइल

Amla Hair Packs : केसांच्या समस्यांमुळे त्रस्त आहात? आवळा आहे मदतीला! बनवा ‘हे’ हेअर पॅक

केसांसाठी आणि त्वचेसाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amla Hair Packs : आवळा हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. केसांसाठी आणि त्वचेसाठी आवळा सुपरफूड म्हणून ओळखला जातो. आवळ्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक उपलब्ध आहेत. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सिडंट्स असतात.

आवळा हा चवीला तुरट आणि आंबट असला तरी त्याचे शरिराला होणारे फायदे भरपूर आहेत. हे विसरून चालणार नाही. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन क आणि टॅनिन या पोषणतत्वांचा प्रामुख्याने समावेश होतो.

आवळ्याचे केसांना होणारे फायदे सगळ्यांनाच माहित आहे. या आवळ्यापासून बनवल्या जाणाऱ्या २ हेअर पॅकबद्दल आपण जाणून घेऊयात.

आवळा-मध हेअर पॅक

आवळ्याचे बहुगुणी गुण आपल्याला माहित आहेत. आवळ्याप्रमाणेच मध देखील अनेक गुणांनी समृद्ध आहे. जर हे दोन्ही घटक एकत्र आले तर त्याचा केसांना किती फायदा होईल ना. मधामुळे चेहऱ्याला आणि केसांना एक प्रकारची चमक येण्यास मदत मिळते. निस्तेज केसांना चमकदार बनवण्याचे काम मध करते.

असा बनवा हेअर पॅक

  • २ मोठे चमचे आवळ्याची पावडर घ्या किंवा आवळ्याची बारीक पेस्ट करून घ्या.

  • या पावडरमध्ये किंवा पेस्टमध्ये २ चमचे मध घाला.

  • आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करा, तुमचा हेअर पॅक तयार.

  • हा हेअर पॅक केसांच्या मुळांना लावून केस २० मिनिटे तसेच ठेवा.

  • नंतर केस धुवून टाका.

आवळा-कढीपत्ता हेअर पॅक  

कढीपत्ता नसेल तर आपल्या जेवणाला काहीच चव राहणार नाही. हे आपल्याला मान्य करावचं लागेल. मात्र, स्वयंपाका व्यतिरिक्त कढीपत्ता केसांसाठी अतिशय लाभदायी आहे. कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. आवळा आणि कढीपत्त्याचा एकत्रितपणे हेअर पॅक केला तर तो पातळ केसांची समस्या दूर करण्यास मदत करतो.

असा बनवा हेअर पॅक

  • १०-१२ आवळ्यांचे बारीक तुकडे करून घ्या.

  • या तुकड्यांमध्ये कढीपत्त्याची काही पाने एकत्र करा.

  • आता हे दोन्ही घटक चांगल्याप्रकारे मिक्सरला बारीक करा.

  • ही बारीक पेस्ट तुमच्या स्काल्पला लावा.

  • १-२ तासांसाठी केस असेच ठेवा.

  • त्यानंतर, शॅम्पूने केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT