Anant Chaturdashi 2024 Sakal
लाइफस्टाइल

Anant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी व्रत अन् महाभारतातील पांडवांचा काय आहे संबंध?वाचा पौराणिक कथा

Anant Chaturdashi 2024: आज अनंत चतुर्दशी साजरी केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या व्रताचा पांडवांना देखील लाभ झाला होता.

Puja Bonkile

Anant Chaturdashi 2024: हिंदू धर्मात अंनत चतुर्दशीला खुप महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आणि उपवास केला जातो. तसेच गणपती बाप्पा जसे ढोल-ताशांच्या गजरात येतात त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील ढोल-ताशांच्या गजरात होत. धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पुजा केल्याने सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. पांडवांना देखील अंनत चतुर्दशी व्रताचे फायदे झाले होते अशी कथा आहे. ही कथा कोणती आहे जाणून घेऊया.

काय आहे कथा

कौरव पांडवांमध्ये जेव्हा द्युत खेळत होते तेव्हा सर्व संपत्ती हारले होते. त्यांना बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा लागला होता. तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना वनसात भेट देऊन संकटातून मुक्त होण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले होते. खरं तर श्रीकृष्णाने या व्रताची एक कथी सांगितली होती.

सुमंतू नामक एक ब्राम्हण होता. त्याला एक शीला नावाची कन्या होती. मुलीच्या जन्मानंतर आईचा मृत्यू झाला. त्यामुळे सुमंतू ब्राम्हणाने पुन्हा लग्न केले. पण दुसरी पत्नी कजाग, भांडखोर होती. नंतर काही दिवसांनी शालाचे लग्न कौंडिण्यमुनीबरोबर झाले, लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली तेव्हा सुमंतूने पत्नीकडे शीलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्याच्या पत्नीने काहीही न देण्यास सांगतिले. उलट जवाई आणि मुलीचा अपमान केला. त्यामुळे शीला खुप दु: खी झाली. ती सासरी जाण्यास निघाली. जाताना तिला काही महिला नदी किनारी पूजा करताना दिसल्या. ते अनंताचे व्रत होते. तिनेही मनोभावे व्रत केला.

व्रतात सांगितल्याप्रमाणे तिने स्वत:च्या हाता अनंताचा दोरा बांधला. नंतर ती सासरी आली. त्या व्रतामुळे संसारात समृद्धी आली. कौंडिण्यमुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या प्रगतीचा गर्व झाला. त्यांनी शीलाच्या हातातील अनंत धागा काढून जाळून टाकला. नंतर अनंत त्याच्यावर कोप पावला. मिळालेले यश निघून गेले आणि पुन्हा दारिद्र्याचे दिवस आले.

शीलाने पतीला त्याची चूक समजावून सांगितली. कौंडिण्यमुनीला व्रताचे महत्व समजले. नंतर ते वनात गेले आणि अनंताचे व्रत करण्याचे ठरवले. तेव्हा अनंताने म्हणजेच भगवान विष्णूने ब्राम्हरूपात दर्शन दिले. अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगतिले. त्यांनी तसे केले. नंतर वैभव प्राप्त झाले. कौंडिण्यमुनीला जसे वैभव प्राप्त झाले तसे पांडवांना प्राप्त व्हावे यासाठी श्रीकृष्णाने युधिष्ठिराही वनवासात असताना अनंत व्रत करण्यास सांगितले. पांडवांनी तसेच केले आणि त्यांनी चांगले फळ मिळाले.

या कथेचा सार असा की देवाच्या कृपेने मिळालेल्या गोष्टींचा आदर करावा. स्वत:कडे असलेल्या गोष्टींचा गर्व करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT