Anant Radhika pre wedding function Mukesh Ambani Sister Deepti Salgaonkar net worth 
लाइफस्टाइल

लाईमटाईमपासून दुर असणारी अंबानींची लाडकी बहिणदेखील कोट्याधिश; जाणून घ्या दिप्ती साळगावकरचे नेटवर्थ

अनंत राधिका यांच्या लग्नामुळं संपुर्ण अंबानी कुटुंब चर्चेत आलं आहे. संगीत सोहळ्यानंतर काल अनंत राधिकाचा हळदी समारंभ पार पडला.

सकाळ डिजिटल टीम

अनंत राधिका यांच्या लग्नामुळं संपुर्ण अंबानी कुटुंब चर्चेत आलं आहे. संगीत सोहळ्यानंतर काल अनंत राधिकाचा हळदी समारंभ पार पडला. या सोहळ्याला पाहुण्यांची मंदियाळी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या पाहुण्यामंडळीमध्ये सर्वांचे लक्ष वेधलं ते म्हणजे अंबानींच्या लाडक्या बहिणीने. म्हणजेच दिप्ती साळगावकर.

दिप्ती सालगावकर लाईमटाईमपासून दुर असल्या तरी अनंत राधिकाच्या लग्नामुळ त्या चर्चेत आल्या आहेत. दोघेही 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान काल, हळदी समारंभ पार पाडला. या समारंभाला संपूर्ण अंबानी कुटुंब उपस्थित होत. यावेळी मुकेश अंबानी यांची बहिण दिप्ती साळगावकरदेखील उपस्थित होत्या.

दिप्ती यांचे काही फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं म्हणजेच गुजराती लाल रंगाची साडी परिधान केली होती. यावर त्यांनी डायमंडने भरलेला लाँग हार परिधान करत सौंदर्यात भर घातली होती.

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे पुत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या दोन बहिणी दीप्ती आणि नीना यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दोघीही लाईमटाईमपासून लांब असतात.

दीप्ती साळगावकर ही अंबानी भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1962 रोजी झाला. तिचे लग्न गोव्यातील व्यापारी दत्तराज साळगावकर यांच्याशी झाले आहे.

माहितीनुसार, दीप्ती साळगावकर यांची एकूण संपत्ती सुमारे एक अब्ज डॉलर्स आहे. त्यांचे पती दतराज साळगावकर हे गोव्यातील प्रसिद्ध व्यापारी आहेत. ते व्हीएम साळगावकर ग्रुप ऑफ कंपनीजचे मालक आणि एमडी आहेत.

ते गोव्यातील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब साळगावकरचेही मालक आहेत. गोव्याची संस्कृती वाचवण्यासाठी दत्तराज यांनी सुनापरंताची स्थापना केली आहे. दीप्ती साळगावकर या संस्थेच्या उपाध्यक्षा व सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.

दीप्ती आणि दत्तराज साळगावकर यांना एक मुलगी आहे. तिचं नाव इशिता साळगावकर असे आहे. इशिता ही देखील एक बिझनेस वुमेन आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर, ती साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटची उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इशिताने यापूर्वी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशल मोदीसोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. घटस्फोटानंतर, इशिताने 2022 मध्ये नेक्सजू मोबिलिटीचे संस्थापक अतुल्य मित्तलशी लग्न केले. अतुल्य स्टील हा टायकूल लक्ष्मी निवास मित्तल यांचा पुतण्या असून तो एक यशस्वी व्यापारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: हा देश अंबानीच्या मुलाच्या वडिलांचा…; महादेवीसाठी कुणाल कामरा मैदानात, नव्या ट्विटनं पुन्हा अडचणीत येणार?

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

SCROLL FOR NEXT