Nita Ambani Gold blouse in Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाच्या पुजेला वरमाईंचा रॉयल अंदाज, परिधान केला चक्क सोन्याचा ब्लाऊज.!

Nita Ambani Gold blouse in Wedding: अनंत आणि राधिकाच्या विशेष पुजेला नीता अंबानींनी परिधान केलेला लेहेंगा-चोली लूक खूपच चर्चेत आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika Wedding : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलैला राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरूवात झाली असून, त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होताना पहायला मिळत आहे. बॉलिवूड, हॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींची त्यांच्या सोहळ्यांना उपस्थिती दिसून येत आहे.

या सगळ्या सोहळ्यांमध्ये अनंत अंबानीची आई नीता अंबानी यांचे विविध लूक्स चर्चेत आले आहेत. अनंत आणि राधिकासाठी बुधवारी सायंकाळी एका विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पुजेला नीता अंबानींनी खास लूकमध्ये हजेरी लावली होती.

त्यांचा हा लेहेंगा-चोली लूक खूपच चर्चेत आला आहे. ६० वर्षांच्या नीता अंबानींसमोर त्यांची मुलगी आणि सूना देखील फिक्या पडल्या होत्या. नीता अंबानींचा हा क्लासी लूक नेमका कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

नीता अंबानींचा खास लूक

अनंत आणि राधिकाच्या लग्नानिमित्त अंबानी कुटुंबात बुधवारी (१० जुलै) शिव-शक्ती पूजा पार पडली. या पुजेला नीता अंबानी यांनी प्रसिद्ध डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेली स्पेशल लेहेंगा-चोली परिधान केली होती. या हिरव्या-निळ्या रंगाच्या लेहेंगा-चोलीवर हाताने भरतकाम करण्यात आले असून, त्यावर सोन्याच्या जरीवर्कसोबतच मिरर वर्क देखील करण्यात आले आहे.

नीता अंबानी

या लेहेंगा-चोलीला वेगळा टच देण्यासाठी त्यांनी निळ्या रंगाचा सॅटिन दुपट्टा कॅरी केला होता. जो त्यांच्या संपूर्ण लूकला चारचाँद लावत होता. या हेव्ही एम्ब्रॉयडरी केलेल्या लेहेंगा-चोलीमध्ये नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या.

सोन्याच्या ब्लाऊजने वेधले लक्ष

नीता अंबानींच्या या लेहेंगा चोलीच्या बॉर्डरवर झिगझॅग लाईन्समध्ये हेव्ही वर्क करण्यात आले होते. परंतु, या लेहेंगा-चोली व्यतिरिक्त नीता यांच्या ब्लाऊजने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले होते. कारण, त्यांनी परिधान केलेला ब्लाऊज हा चक्क सोन्याचा होता. शिवाय, त्यावर चंदनहाराचे सुबक नक्षीकाम करण्यात आले होते. विशेष म्हणजे नीता अंबानींच्या या सोन्याच्या ब्लाऊजला गोल नेकलाईन होती, ज्यावर सोन्याच्या तारेमध्ये काम करण्यात आले होते.

नीता अंबानींचा ज्वेलरी अन् मेकअप लूक

नीता यांनी या लेहेंगा-चोलीवरचा लूक पूर्ण करण्यासाठी खास ज्वेलरी परिधान केली होती. त्यांनी या लेहेंगा-चोलीवर डायमंड, पन्ना आणि रूबीचे दागिने घातले होते. त्यांनी पोल्की नेकलेस देखील गळ्यात घातला होता.

या नेकलेसशी जुळणारे मॅचिंग कानातले त्यांनी घातले होते. तसेच हातात, हिऱ्याने जडलेल्या बांगड्या घातल्या होत्या. या सुंदर लेहेंगा-चोलीवर नीता अंबानी यांनी न्यूड मेकअप केला होता. हेअरस्टाईलबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी केसांचे साईड पार्टिशियन करत सुंदर बन घातला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Pune Crime : तरुणीने केले जिवाभावाच्या मैत्रिणीवर चाकूने वार; कोरेगाव पार्क परिसरातील घटना!

SCROLL FOR NEXT