Anant-Radhika Wedding  esakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Wedding : सात फेरे घेतल्यानंतरही अनंत-राधिकाने एकमेकांना दिलं हे खास वचन, नेटकरी म्हणतायंत...

12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

सकाळ डिजिटल टीम

Anant-Radhika Wedding :

कोणत्याही विवाहात सात फेरे पूर्ण झाल्याशिवाय लग्न संपन्न होत नाही. त्यामुळेच, हिंदू विवाह प्रथेनुसार लग्नात सप्तपदी घ्यावीच लागते. या सप्तपदीमध्ये पती-पत्नी एकमेकांना काही वचनं देतात. पण, सध्या ट्रेंडीग असलेल्या अनंत-राधिकाने मात्र एक वेगळेच वचन घेतले. त्याची चर्चा आता होत आहे.

12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. एवढेच नाही तर या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अनंत आणि राधिकाने अग्निसोबत सात फेरेही घेतले आणि अग्नीला साक्षी ठेऊन एकमेकांना वचनेही दिली. (Anant- Radhika Wedding)

राधिकाने वचन दिले की, आपले घर फक्त राहण्यासाठीच एक ठिकाण नसेल. तर, त्या घरात आपले प्रेम आणि आपुलकीची भावनाही असेल. आपण दोघे जिथेही एकत्र असू ते आपलं प्रेमाचं घर असेल.

तर, अनंत राधिकाकडे पाहत म्हणाला की, "राधिका, श्री कृष्णाच्या आशीर्वादाने, मी वचन देतो की, आपण मिळून आपल्या स्वप्नांचे घर बांधू. आपले घर फक्त राहण्यासाठी चार भिंतींनी बनवले जाणार नाही. प्रेम असेल आणि आपण जिथे राहतो तिथे, ते आमचे घर असेल जे फक्त प्रेमाने भरलेले असेल.

अनंत राधिकाच्या या वचनांवर नेटीझन्स मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी अनंत-राधिकाला हिंदी किंवा गुजरातीमध्ये घ्यायला हवी होती. पण, राधिकाने इंग्रजीमध्ये वचन घेतलं त्यामुळे त्यांच्यावर टिका होत आहे.  एका युजरने लिहीलं आहे की, संपूर्ण लग्न विधीवत पार पाडलं,पण वचन इंग्रजीतून घेतली ते चुकलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT