Hanuman Jayanti 2024: esakal
लाइफस्टाइल

Hanuman Jayanti 2024: अंजनीसुत हनुमानांनी सुर्याकडे झेप घेतली तो डोंगर पाहिलाय का?

हनुमानांच्या डाव्या पायाचा आकार असलेले तळे इथले आकर्षण आहे

सकाळ डिजिटल टीम

Hanuman Jayanti 2024:

बाल हनुमान नटखट होते. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बाल हनुमान घरात खेळत असताना त्यांना झाडावरील एक आंबा खायचा होता. पिवळा धमक दिसणारा तो आंबा कधी एकदा खातोय, असे त्यांना झाले. त्या फळासाठी त्यांनी आकाशात उंच झेप घेण्याचे ठरवले.

पण ते चमकते फळ झाडाला नाही तर आकाशाला लागलेले होते. बाल हनुमान जो हट्ट करत होते ते सुर्याला खाण्याचा होता. यासाठी त्यांनी उंच आकाशात झेपही घेतली. ती झेप ज्या डोंगरावरून घेतली तो आपल्या महाराष्ट्रात आहे.

अंजनेरी पर्वत

हनुमानांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या अंजनेरी डोंगरावर झाला. अंजनेरी हे नाव देखील हनुमानाच्या आईच्या अंजनी मातेच्या नावावरूनच पडले असल्याचे जाणकार सांगतात. त्र्यंबकेश्वरमधील पर्वत रांगेतील ‘अंजनेरी’ महत्वाचा पर्वत आहे.

मारूतीरायांच्या या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.

अंजनेरी गावातून किल्ल्यावर जाताना वाटेतच पायऱ्यांच्या जवळच गुहेत जैनधर्मीय लेणी आपल्याला दिसून येतात. पुढे पठारावर पोहोचल्यावर काही वेळातच अंजनी मातेचे मंदिर दृष्टीस पडते. मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त असून, मुक्काम करण्यासाठी देखील तिथे योग्य अशी सोय केली आहे.

बाल हनुमान लहानपणीही नटखट होते. त्यांच्या पराक्रमांना बालपणही रोखू शकले नाही. अगदी अजाणत्या वयातही त्यांनी  सुर्याकडे झेप घेण्यासाठी आकाशात उंच उडी घेतली होती. तेव्हा त्यांच्या पायाचा ठसा या अंजनेरी पर्वतावर आहे. तिथे एक तळे निर्माण झाले असून त्याचा आकार मानवी पायासारखाच आहे.

बाल हनुमानांच्या पायाच्या आकाराचे तळे

जेव्हा तुम्ही बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर तेव्हा तुम्हाला समजेल की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहे. या तळ्यात नेहमी पाणी असते. या पाण्याला स्पर्श करणे म्हणजेच हनुमानाच्या चरणाला स्पर्श करण्याचे पुण्य मिळाले असे सांगितले जाते.

समोर गेल्यावर आपल्याला अंजनी मातेची गुफा लागते. असे म्हटले जाते की अंजनी मातेने अनेक वर्ष भगवान शंकरांकडे पुत्र व्हावा म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमानजींचा जन्म झाला. अंजनी मातेने याच पर्वतावर हनुमानजींना जन्म दिला असे म्हटले जाते. अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमान जी यांचे अशी एकमेव मूर्ती आहे.

अंजनेरी पर्वताचे पावसाळ्यातील सुंदर दृश्य

दुर्मिळ वनस्पतींचे भांडार

वन विभागाच्या सहकार्याने जुई पेठे या अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहेत. अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सेरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही ती अंजनेरी डोंगरावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: बुमराह लॉर्ड्स कसोटीत खेळणार की नाही? दुसऱ्या कसोटी विजयानंतर कॅप्टन गिलने स्पष्ट शब्दात सांगितलं

Ujani Dam Water: 'उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय एक दिवस लांबणीवर'; पंढरपुरातील वारकऱ्यांच्या गर्दीमुळे घेतला निर्णय

CA Final 2025 Results: सोशल मीडियापासून दूर राहिलो, आणि देशात टॉप आलो! सीए टॉपर्सची यशोगाथा

Pune : गांधीजींच्या पुतळ्याचं डोकं उडवण्याचा प्रयत्न, एकाला अटक; काँग्रेस करणार आंदोलन

Raigad Suspicious Boat : अलिबागजवळ समुद्रात आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर; हेलिकॉप्टरद्वारे शोध सुरु

SCROLL FOR NEXT