Anjeer Water Benefits esakal
लाइफस्टाइल

Anjeer Water Benefits:  औषधांची सुट्टी करायची असेल तर अंजीर खाण्याशिवाय पर्याय नाही, एकदा बघा त्याचे किती फायदे आहेत ते!

अंजीराचे पाणी पिण्याचे देखील अनेक आरोग्य फायदे

Pooja Karande-Kadam

Anjeer Water Benefits: अंजीर हे सुपरफूड म्हणून ओळखले जाते, त्यात अनेक गुणधर्म आहेत, जे आरोग्यास प्रोत्साहन देतात. हा ड्राय फ्रूट पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक आढळतात.

अंजीराचे पाणी पिण्याचे देखील अनेक आरोग्य फायदे आहेत. होय, सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात. यामुळे वजन कमी होते तसेच मधुमेहाशीही दोन हात करण्यात अंजीर फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या अगणित फायद्यांविषयी.

पचनसंस्था निरोगी ठेवते

अंजीराचे पाणी डिटॉक्स ड्रिंकचे काम करते. यामध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवते. सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्याने मल जाण्याची प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय हे पाणी आतड्यांचे आरोग्य देखील वाढवते. (Weight Loss Tips)

हृदय निरोगी ठेवते

रोज सकाळी रिकाम्या पोटी अंजीराचे पाणी प्यायल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हे फायबर आणि पोटॅशियमचा समृद्ध स्रोत आहे. हे प्यायल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त राहाल.

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

अंजीरच्या पाण्याचा समावेश करू शकता. तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात. ज्या लोकांना वजन नियंत्रणात ठेवायचे असेल त्यांनी हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे, ते खूप फायदेशीर ठरेल. तुमचे चयापचय वाढेल, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

पोषक तत्वांनी युक्त अंजीर रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्यास मदत करते. असे मानले जाते की अंजीरचे पाणी प्यायल्याने टाइप-2 मधुमेहामध्ये ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही स्मूदी किंवा सॅलडमध्ये अंजीरचाही समावेश करू शकता.

उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवते

अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर असतात, जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी दररोज अंजीरचे पाणी प्यावे, ज्यामुळे रक्तदाब सामान्य होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

प्रत्येक शॉटआधी २० लिटर दूध अन् गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ? रवि किशन यांनी सांगितला सेटवरचा किस्सा!

H-1B Visa: IBM चा भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; एक तर अमेरिका सोडा किंवा नोकरी सोडा!

Latest Marathi News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 84.36% मतदान

Vedant Sehwag 7 Wickets: वीरूच्या लेकाने घेतल्या ७ विकेट्स! वेदांत सेहवागच्या माऱ्यासमोर भलेभले गार; आर्यवीरने टोलावले ३ चौकार, २ षटकार

SCROLL FOR NEXT