Mental Health sakal
लाइफस्टाइल

Mental Health Tips: तुम्हीही आहात Overthinking चे शिकार? मग हे उपाय करून बघा

प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात उतार-चढ हे सुरूच असतात. पण काही जणांना आपल्या जीवनाविषयी फार तक्रारी असतात.

Aishwarya Musale

प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात उतार-चढ हे सुरूच असतात. पण काही जणांना आपल्या जीवनाविषयी फार तक्रारी असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना जड होऊ लागतात. याच तणावात ते आपल्या आयुष्यातील आनंद, उत्साह हरवून बसतात व नेहमी आपल्याच विचारात बुडालेले असतात. आणि सतत विचार करूण त्यांना ओव्हरथिंकिंग सारखी समस्या निर्माण होते.

एका संशोधनानुसार माणसाला 24 तासात 70 हजारपेक्षा जास्त विचार येतात. बदलती जीवन शैलीमुळे आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. खूप जास्त विचार करणे हा देखिल एक प्रकारचा मानसिक आजारच आहे.

वाचन करणे, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सोशल मीडियावर सतत सक्रिय राहणे आणि अन्य अनेक कारणांमुळे अनेकांना खूप जास्त विचार करण्याची सवय जडते. अशा माणसांना एक मिनिट देखिल शांत राहता येत नाही. त्यांना खूप त्रास होतो.

यावर उपाय म्हणून योगासन प्राणायाम याकडे हे लोक वळतात. मात्र एवढे करूनही अनेकांची खूप जास्त विचार करण्याची सवय जात नाही. योगासन प्राणायाम यांच्यामुळे थोडावेळ साठी विचारांची गती कमी होते.

मात्र, अनेक वेळा आपल्या आजकालच्या फास्ट फॉरवर्ड लाइफस्टाइलमुळे योग-प्राणायामाच्या सवयीत देखिल सातत्य राहत नाही. परिणामी जास्त विचार करणे, अतिरिक्त विचार करणे हा आजार काही जात नाही.

हे साधे उपाय करून पाहा

श्वासावर लक्ष द्या

दर दोन तासातून 5 मिनिटे स्वतःच्या श्वासावर लक्ष द्या. घड्याळात वेळ लावून किंवा मोबाईममध्ये अलार्म लावून मोजून 5 मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष द्या. लक्षात घ्या तुम्हाला प्राणायाम करायचा नाही. फक्त श्वासावर लक्ष द्यायचे आहे. डोळे मिटून तुम्हाला फक्त एवढे लक्ष द्यायचे आहे की श्वास कसा येतो आणि कसा जातो.

श्वास मोजणे

तुम्हाला श्वासावर लक्ष केंद्रित करता येत नसेल तर श्वास मोजणे हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. विशेष करून रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करून श्वास उलटे मोजायचे आहे. म्हणजे 100, 99, 98 असे करत एक पर्यंत यायचे. किमान 5 मिनिटे रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा. दररोज केल्याने निश्चितच विचारांची गती कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती उघड

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT