super meteor 650 royal enfield
super meteor 650 royal enfield sakal
लाइफस्टाइल

झूम : लक्षवेधी सुपर मिटीओर

अरविंद रेणापूरकर

बुलेट चालविणे हे प्रत्येक दुचाकीस्वारांचे स्वप्न. मात्र, किंमत आणि वजनाचा विचार करता ती सर्वांनाच झेपेल असे नाही. रॉयल एन्फिल्डने नेहमीच प्रीमियम सेगमेंटमध्ये बाजारात गाड्या आणल्या आणि ही परंपरा अविरत सुरू आहे. दणकटपणा आणि वेगाच्या बाबतीत रॉयल एन्फिल्डच्या गाड्यांना तोड नाही.

इंजिनची क्षमता वाढविण्याबरोबरच चालकाला ऐटबाज सवारीचा अनुभव यावा यासाठी निर्माते प्रयत्नशील राहिलेले आहेत. ६५० सीसी क्षमतेची इंटरसेप्टर आणि कॉन्टिनेंटल जीटीच्या श्रेणीत आता मिटीओरचाही समावेश करावा लागेल.

मिटीओरचा विंटेज लूक हा सर्वांना आकर्षित करतो. शहर किंवा ग्रामीण भागातील कोणताही ‘बुलेट राजा’ असो, धडकी भरवणारे फायरिंग हेच त्याचे बलस्थान राहिले आहे. मिटीओर चालवतानादेखील हाच अनुभव येतो.

रॉयल एन्फिल्डने गेल्यावर्षी सुपर मीटिओर-६५० लॉंच केली. गोलाकार एलईडी इंडिकेटर, रुंद हँडलबार, ॲल्युमिनिअमचे टूरिंग मिरर, मेकॅनिकल व्हील्स, बॅकरेस्ट, डिलक्स फुटपेग आदींनी वैशिष्ट्यपूर्ण असलेली मिटीओरची एलईडी हेडलॅम्प, मोबाईलला कनेक्ट करणारे नेव्हीगेशन हे आधुनिकतेची कास धरतात.

६४८ सीसी पॅरलल ट्विन इंजिनच्या ऊर्जेचा वापर करणारी रॉयल एन्फिल्डची ही तिसरी मोटारसायकल. मिटीओरचे इंजिन ७२५० आरपीएमला ४७ एचपी ऊर्जा आणि ५६५० आरपीएमवर ५२.३ एनएमचा टॉर्क जनरेट करते. या इंजिनला ६ स्पीड गिअरबॉक्सने जोडले आहे. याकडे पारंपरिक क्रुझर मोटारसायकल म्हणून पाहता येईल.

मिटीओरमध्ये ‘४३ एमएम शोवा इन्व्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क्स’चा वापर केला आहे. ट्रिपर नेव्हिगेशनयुक्त असलेली रॉयल एन्फिल्डची ही पहिली मोटारसायकल. यूएसबी चार्जिंग पोर्टची सुविधा आहे. ब्रेकिंगचा विचार केल्यास सुपर मिटीओरमध्ये टू-पिस्टन कॅलिपरसह पुढे सिंगल ३२० एमएम डिस्क असून, मागच्या बाजूला ३०० एमएमचे डिस्क आहे.

ड्युअल चॅनेल एबीएसला स्टँडर्ड फिटमेंटच्या रूपात सादर करण्यात आले आहे. मिटीओरची १५.७ लिटरची इंधन टाकी आहे. गाडीचे नेव्हिगेशन वापरण्यासाठी रॉयल एन्फिल्डचे ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे लागते. या गाडीचे मायलेज २३.७ किलोमीटर असल्याचे सांगितले जाते.

रॉयल एन्फिल्डच्या गाड्या वजनासाठीच ओळखल्या जातात आणि मिटीओरचे वजन २४१ किलोच्या आसपास आहे. सात रंगात उपलब्ध असणाऱ्या मिटीओरचा ग्राउंड क्लिअरन्स १३५ मिमी आहे.

वैशिष्ट्ये

  • अपराइट रायडिंग पोझिशन, प्रॉपर रेट्रो डिझाइन, टियर ड्रॉप शेप्ड फ्युएल टँक, मागच्या टायरसाठी फेंडरयुक्त मिटीओर उपलब्ध आहे.

  • सुपर मिटीओरची रचना ही ३५० मिटीओरसारखीच आहे, किंबहुना त्यापासूनच प्रेरित आहे. मिटीओर ३५० पाहून आपण सुपर मिटीओरचे लहान व्हर्जन म्हणून त्याकडे पाहू शकतो.

  • रॉयल एन्फिल्डचे फ्युएल टँकवरील अनोख्या रचनेतील बॅजिंग.

  • हायलाइट कास्ट ॲल्युमिनिअम स्विच क्युब्स.

चालविण्याचा अनुभव

  • मिटीओरचा ग्राउंड क्लिरन्स कमी असला, तरी खड्ड्यांतून आणि उंच स्प्रीडब्रेकरवरून सहजपणे जाते.

  • सस्पेंशन थोडे कठीण असल्याने खडबडीत रस्त्यावर सांभाळूनच जावे लागते.

  • आसन आरामदायी असल्याने चालक आणि जोडीदार सहजपणे वेगात सैर करू शकतात. थोडाही थकवा जाणवत नाही.

  • वाळूतून वेगाने गाडी नेली, तरी घसरण्याचा धोका नाही. पाचव्या गिअरवरही कमी वेगात म्हणजे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने गाडी नेता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT