Ashadhi Wari 2024 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : माऊलींच्या पालखीचे पहिले रिंगण चांदोबाचा लिंब या ठिकाणी पार पडणार, जाणून घ्या यामागील परंपरा

Sant Dyaneshwar Maharaj : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आपला लोणंदमधील दीड दिवसाचा मुक्‍काम संपवून तरडगावकडे मार्गस्थ होते

सकाळ डिजिटल टीम

Ashadhi Wari 2024 :

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने कालच सातारा जिल्ह्यात प्रवेश केला असून ती काल लोणंद येथे मुक्कामी होती. माऊलींच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडणार आहे. साताऱ्यातील चांदोबाचा लिंब येथे हा सोहळा पार पडणार आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीरावाची विहीर आणि वाखरीजवळ अशा तीन, तर माळशिरस, खुडुस फाटा, ठाकूरबुवा समाधी, भंडीशेगावच्या पुढे अशा चार ठिकाणी गोल रिंगण होतं.

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा आपला लोणंदमधील दीड दिवसाचा मुक्‍काम संपवून तरडगावकडे मार्गस्थ होते. तत्पूर्वी दुपारी साडेबारा वाजता विधिवत नैवद्य दाखवून माध्यान्ह आरती होईल. आणि सोहळा उभ्या रिंगणासाठी चांदोबाच्या लिंबकडे प्रस्थान करतो. हजारो लोणंदकरांनी पालखीला सरहद्द ओढ्यापर्यंत येऊन निरोप देतात. सोहळा माउलींच्या गजरात दुपारी ३.५० वाजता चांदोबाचा लिंब येथे पोहोचतो अन् तिथे रिंगण सोहळा पार पडतो. (Ashadhi Wari 2024)

कसे पार पडते हे रिंगण

सुरूवातीला पालखीचे चोपदार रिंगण करण्यासाठी जागेची पडताळणी करतात. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर करत टाळ, मृदुंगाच्या एकाच तालात आणि लयीत पायाचा ठेका देत वारकरी नाचू लागतात.

या रिंगणात भरधाव वेगात अश्व पालखीला तीन प्रदक्षिणा घालतात आणि अभिवादन करतात. पालखी सोहळ्यातील दोन अश्व पुढे धावत असतात. एकावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली स्वार होतात. तर, दुसऱ्या अश्वावर शितोळे सरकारांचा आळंदी संस्थानचा चोपदार हातात झेंडा घेऊन बसलेले असतात.

चोपदारांनी हातातील दंड उंचावून संकेत दिल्यानंतर दोन अश्व वेगाने धाव घेत पुढील टोकाला जातात. पुन्हा माऊलींच्या रथापर्यंत येतात. अश्वांच्या टापाखालील माती कपाळावर लावण्यासाठी वारकरी आणि भाविक अलोट गर्दी करतात.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकोबारांच्या पालखीचा मुक्काम असतो. त्यावेळी मध्यभागी देवाचा तंबू, बाजूने इतरांचे तंबू, मध्यभागी आरतीची जागा अशी रचना असते. रिंगण संपले की, या परिघातच हमामा, फुगडी, हुतूतू, आट्यापाट्या, एकीबेकी हे खेळ टाळ-मृदुंगाच्या गजरात सुरू होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: श्रेयस अय्यरने मागे पळत जात भारी कॅच घेतला, पण लगेचच मैदानातून जावं लागलं बाहेर; नेमकं काय घडंल? पाहा Video

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

Kolhapur Crime : गोव्याला फिरायला गेले अन् बंद बंगला फोडून साडेतेरा तोळे दागिने पळविले, श्वान घराच्या भोवतीच घुटमळलं अन्

Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळ

CSIR UGC NET December 2025: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT