Astrology
Astrology  Esakal
लाइफस्टाइल

Astro Tips: असे नाक असलेले लोक असतात खूप चपळ; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या व्यक्तीच्या हस्तरेषा त्याचे गुण, स्वभाव आणि नशीब याबद्दल माहिती सांगतात हे तर तुम्हाला माहिती असेलच, पण अनेकदा आपण कोणाच्या तरी नाकावरूनही त्याचा स्वभाव ओळखू शकतो. समुद्र शास्त्रात याचा उल्लेख आपल्याला वाचता येईल. समुद्र शास्त्रानुसार तळहाताच्या रेषांशिवाय माणसाची देहबोली, वागणूक आणि स्वभाव सुद्धा जाणून घेता येतो. 

सामुद्रिक शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की एखाद्या व्यक्तीचे शारीरिक स्वरूप आणि अवयव त्याचे गुण, स्वभाव आणि नशीब याबद्दल सांगतात. आपल्या शरीराच्या अवयवांमध्ये नाक महत्त्वाचे मानले जाते.  नाक व्यक्तीची अनेक वैशिष्ट्ये देखील ओळखते. 

● समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्याचे नाक सरळ असेल तर तो साधा स्वभावाचा असतो. असा माणूस आपले म्हणणे सहजासहजी कोणाला सांगत नाही. ही लोकं संयमाने वागतात. अशा लोकांच्या मनात नक्की काय घडतं आहे ते जाणून घेणे जरा कठीण असते. प्रेम संबंधाच्या बाबतीतही ही माणसं जरा कच्ची असतात, यांचे जीवन सतत अस्थायी असते. 

● चपट नाक असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व अस्थिर असते.  त्यांचा स्वभाव परिस्थितीवर अवलंबून असतो. असं म्हणायला हरकत नाही की ते जरा मुडी असतात. ही लोकं घाई गडबडीत निर्णय घेत नाही. 

● पोपटासारखे नाक असणारी माणसं खूप हुशार असतात.  अशा व्यक्तीच्या नाकावर सतत राग असला तरी ही लोकं मनाने निर्मळ असतात. यश मिळविण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.

● मोठ्या टोकदार नाकाची माणसं खूप चपळ असतात; प्रामाणिकपणा आणि विश्वास ठेवावा असच यांचं वागणं असतं पण दुसऱ्यावर विश्वास ठेवताना ही माणसं जरा कचरतात. 

 ● छोटे नाक असलेले लोक जरा मिश्किल असतात; या लोकांना चिंता न घेता आयुष्य जगणं आवडतं. ही लोकं सतत लोकांना सल्ले देत असतात पण म्हणून कोणाच्या कामात ढवळाढवळ करत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kumar Modi: बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला! सुशील कुमार मोदी यांचं निधन

PM Modi: "बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे"; PM मोदींचा पुन्हा ठाकरेंना साद घालण्याचा प्रयत्न?

Chabahar Port: चीनच्या पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला भारताचे 'चाबहार'ने प्रत्युत्तर; इराणसोबत ऐतिहासिक करार

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

SCROLL FOR NEXT