लाइफस्टाइल

Astro Tips : बाळाचे दातही देतात शुभ-अशुभ संकेत? 'या' महिन्यात दात येणे मानले जाते शुभ!

सकाळ डिजिटल टीम

लहान बाळाचे चालणे, बोलणे,दात येणे या गोष्टी ठराविक वेळेत घडतात. काही बाळांमध्ये या क्रिया लवकर घडतात तर काहींना वेळ लागतो. परंतु या गोष्टी लवकर किंवा उशिरा घडल्याने काही शुभ-अशुभ संकेत मिळतात. साधारणपणे, बाळांमध्ये पहिले दात वयाच्या ६ महिन्यांपासून यायला सुरुवात होते. दात येण्याची प्रक्रिया ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते. जाणून घेऊया कोणत्या महिन्यात बाळाचे दात येणे शुभ आणि अशुभ असते. (Children Teeth Auspicious Sign)

जन्मापासून दात असणे

काही बाळांना जन्मापासूनच दात असतात. जर एखाद्या बाळाच्या बाबतीत असे घडले तर ते पालकांसाठी खूप त्रासदायक आहे, असे समजले जाते. एवढेच नाही तर आई-वडिलांच्या दोघांच्याही आरोग्यासाठी ते चांगले मानले जात नाही.

कोणते दात आधी येणे अशुभ

सहसा मुलांचे खालचे दात प्रथम येतात. पण कधी कधी वरचे दात आधी आले तर ते शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की मुलाच्या आजोळसाठी ते शुभ नसते.

या महिन्यात बाळाला दात येणे शुभ

  • ज्योतिषशास्त्रानुसार, जन्माच्या पहिल्या महिन्यात दात येणे शुभ मानले जात नाही. दुसऱ्या महिन्यात बाळाला दात येणे त्याच्या भावांसाठी वेदनादायक आहे.

  • तिसऱ्या महिन्यात दात येणे शुभ मानले जात नाही. चौथ्या महिन्यात दात येणे मुलाच्या पालकांसाठी शुभ नाही. ज्येष्ठ भावासाठी पाचवा महिना शुभ नाही.

  • सहाव्या महिन्यात बाळाला दात आले तर ते शुभ मानले जाते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. सातव्या महिन्यात दात येणे पित्यासाठी शुभ मानले जाते.

  • आठव्या महिन्यात दात येणे बाळाच्या मामांसाठी त्रासदायक असते. तर, नववा महिना शुभ मानला जातो. त्याचबरोबर दहाव्या महिन्यात दात येणे बाळाच्या जीवनात भरभराट घेऊन येते.

  • अकराव्या आणि बाराव्या महिन्यात दात येणे शुभ मानले जाते. आकराव्या महिन्यात भरभराट होते. आणि बाराव्या महिन्यात दात आल्यामुळे जीवन संपत्ती आणि अन्नाने भरलेले असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

Pune Accident: दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला जामीन; पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा आहे मुलगा

SCROLL FOR NEXT