Astrology Facts  
लाइफस्टाइल

Astrology Facts : चप्पल हरवणं शुभ मानलं जातं का, शास्त्र काय सांगतं?

तुमच्या आयुष्यात येणारी संकटे दूर होतात

सकाळ डिजिटल टीम

Astrology Facts :

काहीवेळा मंदिराच्या बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर चप्पल चोरीला जाते. काही लोक चप्पल चोराला शिव्या देतात आणि गप्प होतात. तर काही लोक चप्पल चोरीला गेले म्हणजे आपल्या मागची पिडा गेली असे म्हणतात. यामागे काय शास्त्र आहे आणि त्यात काही तथ्य आहे का याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ज्योतिषशास्त्रात आपले पाय शनि ग्रहाशी संबंधित मानले जातात. शूज आणि चप्पल आपल्या पायांना झाकतात, म्हणून त्यांना शनीचे प्रतीक देखील मानले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही तुमचे बूट आणि चप्पल हरवते, तेव्हा असे मानले जाते की, शनिदेवांनी त्यांचे कर्ज फेडून घेतले ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकटे दूर होतात, अशी भावना आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात कुंडलीत कधी ना कधीतरी शनीची साडेसाती लागते. या साडेसातीत अनेक मानसिक आणि शारीरिक भोग भोगावे लागतात. याशिवाय शूज आणि चप्पल हरवल्याने शनीच्या सती किंवा दशाचा प्रभाव कमी होतो, असेही मानले जाते.

चप्पल दान केल्याने मिळते पुण्य

एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळते. तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार शूज आणि चप्पल हरवणे हे जुन्या कर्जापासून मुक्ततेचे लक्षण असू शकते. असे मानले जाते की शनिदेव तुमचे बूट आणि चप्पल काढून टाकून तुमच्या कर्जाचे ओझे हलके करतात. याशिवाय तुमच्या जीवनात कोणतीही समस्या आली तर त्यातूनही तुमची सुटका होऊ शकते.

शूज आणि चप्पल गमावणे ही एक नवीन सुरुवात आहे

असे म्हणतात की जुने शूज आणि चप्पल हे तुमच्या जुन्या आयुष्याचे प्रतीक आहेत आणि त्यांचे नुकसान हे तुमच्या जीवनातील नवीन संधींची सुरुवात आहे. शूज आणि चप्पल हरवल्याने तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जावे लागू शकते. नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्यासाठी तरी अपेक्षित नसलेला प्रवास तुम्हाला करावा लागतो. त्यामुळे जीवनात नवे प्रवास घडतात, अशी मान्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT