New Year Astrology  sakal
लाइफस्टाइल

New Year Astrology : 'या' राशींना मिळणार नवीन वर्षात त्यांचं खर प्रेम

त्या राशी कोणत्या? जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

माणूस हा नेहमी प्रेमाच्या शोधात असतो. आयुष्यात एक चांगला प्रेम करणारा जोडीदार मिळावा असे प्रत्येकाला वाटते पण काही लोकांना त्याचं खरं प्रेम कधीच मिळत नाही. पण अशा लोकांसाठी नवीन वर्ष खूप लाभदायक असणार आहे कारण नवीन वर्षात काही राशींच्या लोकांना त्यांचं खरं प्रेम मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या?

मेष -

मेष राशींना त्यांचं खरं प्रेम मिळणार आहे. मेष राशींचे लोक खूप भावनिक असतात. अनेकदा त्यांना जोडीदार सोडून जातो. पण नवीन वर्षी जो जोडीदार मिळणार तो आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. त्यामुळे खऱ्या प्रेमाने त्यांचं आयुष्य भरुन निघेल.

वृश्चिक -

वृश्चिक राशी त्यांच्या पार्टनरवर खूप प्रेम करतात पण त्यांना सहसा प्रामाणिक जोडीदार मिळत नाही. पण नवीन वर्षी त्यांना प्रामाणिक आणि त्यांच्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळू शकतो. वृश्चिक राशीला मनाप्रमाणे जोडीदार मिळेल.

धनू -

धनू राशीचे लोक खूप रोमँटीक असतात पण त्यांना जोडीदार सहसा बोरींग मिळतो. पण यावर्षी धनू राशीला खूप रोमँटीक आणि प्रेमळ स्वभावाचा जोडीदार मिळणार आहे. धनू राशीसाठी हे वर्ष आयुष्य बदलवणारे ठरतील.

कुंभ -

कुंभ राशीचे लोकांना नेहमीच त्यांचं खरं प्रेम मिळत असतं पण कुंभ राशीचे लोक खूप निष्काळजीपणाने वागणारे असतात त्यामुळे समोरचं प्रेम त्यांच्याकडे टिकत नाही पण नवीन वर्षी तुम्हाला खऱ्या प्रेमाची जाणीव होणार. या राशीचे लोक प्रेमात पडणार. त्यांना जोडीदारचं महत्त्व पटेल.

मीन -

मीन राशीचे लोक खूप शांत स्वभावाचे असतात. त्यांना कधीच व्यक्त होणे आवडत नाही. त्यामुळे ते अनेकदा मनात असूनही प्रेम व्यक्त करू शकत नाही. पण या वर्षी त्यांना व्यक्त होण्याची संधी मिळणार आणि ते खरं प्रेम मिळवणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT