मानेच्या समस्या दूर ठेवा Esakal
लाइफस्टाइल

Mobile Laptop च्या अतिवापराने वाढतोय Tech Neckचा धोका, होऊ शकतात गंभीर परिणाम

टेक नेकची समस्या निर्माण झाल्यास मान, खांदे आणि पाठीमध्ये असह्य वेदना Pains होवू लागतात. तसचं जबडा आणि डोकं दुखू लागतो. याचसोबत खांद्यामध्ये आणि हातामध्ये झिणझिण्या येऊन अनेकदा हात सुन्न पडतात

Kirti Wadkar

अलिकडे कामाच्या निमित्ताने तासंतास लॅपटॉपचा Laptop वापर करणं गरजेचं झालं आहे. तर अगदी लहान मुलांपासून तरुण आणि घरातील मोठ्या व्यक्तीदेखील सतत मोबाईलमध्ये डोक खूपसून गुंग होताना दिसतात. सलग ३-४ तास कोणताही ब्रेक न घेता मोबाईल Mobile किंवा लॅपटॉपच्या वापरामुळे मानेच्या काही गंभीर समस्या निर्माण होण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढू लागलं आहे. Avoid mobile laptop overuse to keep yourself away from tech neck

अनेक तास शरीराची हालचाल न करता मान वाकवून किंवा पाठीला बाक काढून मोबाईल आणि कंम्प्युटरवर काम केल्याने टेक नेक सारखी मानेची गंभीर समस्या Neck Problem निर्माण होवू लागली आहे. या समस्येला टेक्स्ट नेक Text Neck असंही म्हणतात.

महत्वाची बाब म्हणजे या समस्येतून बाहेर पडणं किंवा तिच्यावर उपचार Remedy करणं अत्यंत कठिण असून या समस्येचा तुम्हाला आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो.

टेक नेकची समस्या निर्माण झाल्यास मान, खांदे आणि पाठीमध्ये असह्य वेदना Pains होवू लागतात. तसचं जबडा आणि डोकं दुखू लागतो. याचसोबत खांद्यामध्ये आणि हातामध्ये झिणझिण्या येऊन अनेकदा हात सुन्न पडतात. यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.

टेक नेकचा त्रास कशामुळे होतो

मोबाईल किंवा कम्प्युटरवर काम करत असताना जेव्हा एखादी व्यक्ती जास्त वेळ मान वाकवून बसते तेव्हा पाठीचा कणा आणि खांद्याच्या स्नायूंवर जास्त दबाव निर्माण होतो. ज्यामुळे व्यक्तीचं बॉडी पॉश्चर बिघडतं. यामुळे पाठीचा कणा आणि मानेच्या समस्या निर्माण होवू लागतात.

अशी स्थिती कायम राहिल्यास मान, पाठीचा कणा, खांदे आणि डोकेदुखीचा त्रास सुरु होते. अनेकदा तीव्र वेदनांचा सामना करावा लागू शकतो. यासाच टेक नेक असं म्हणतात.

हे देखिल वाचा-

टेक नेकच्या समस्येवर उपाय

बॉडी पोश्चर सुधारणे- काम करताना किंवा मोबाईल हाताळताना तुमचं बॉडी पोश्चर साध्या भाषेत म्हणायचं झालं तर तुमची बसण्याची पद्धत योग्य असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही जिथे कामाला बसता ती जागा योग्य असणं गरजेचं आहे. तुमच्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा स्क्रिन तुमच्या बरोबर डोळ्यासमोर असेल याची काळजी घ्या.

तसंच टेबल आणि खुर्चीची उंची योग्य असणं आणि पुरेसा प्रकाश असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मोबाईल हाताळताना देखील तो खाली वाकून न पाहता. चेहऱ्या समोर वर धरण्याचा प्रयत्न करा.

हे देखिल वाचा-

कामातून ब्रेक घेणं गरजेचं- जर तुमचं काम सतत खुर्चीत बसून असेल तर पाठीच्या कण्यावर तसंच खांद्यांच्या स्नायूंवर त्याचा परिणाम होतो. यासाठीच दर तासाला एक छोटा ब्रेक घ्या. खुर्चीतून उठून पाय मोकळे करा.

तसचं शक्य झाल्यास दर २ तासांनी मानेचे काही व्यायाम तुम्ही करू शकता. किंवा हलकी स्ट्रेचिंग केली तरी यामुळे स्नायूंना आराम मिळेल.

गॅजेट्सचा कमी वापर- टेक नेक या आजारावर मात करायची असेल तर गॅजेट्सच्या वापरावर मर्यादा आणणं हा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणता येईल. जीवनशैलीत योग्य ते बदल करून योग्य आहार घेतल्यास टेक नेक सारख्या आजाराचा धोका टाळणं शक्य आहे.

टेक नेकमुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

मसाज- जर तुम्हाला मानेचा किंवा पाठ आणि खांदे दुखीचा त्रास सुरू झाला असेल तर तुम्ही ऑइल मसाज घेऊ शकता. मोहरी, लवंग किंवा लवेंडर अशा गरम तेलाने मानेला मसाज घेतल्यास आराम मिळू शकतो. यामुळे पाठ आणि मानेच्या नसा मोकळ्या होवून आराम मिळेल. Home remedies for tech neck

हिंग आणि कापूर- पाठीच्या किंवा मानेच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कापूर आणि हिंगाचा लेप लावू शकता. यासाठी हिंग आणि कापूर समप्रमाणात घेऊन ते मोहरीच्या तेलात मिसळावं. ही पेस्ट मानेवर लावल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.

बर्फाचा शेक- मानेचं दुखणं आणि सूज कमी करण्यासाठी तुम्ही बर्फाचा शेक घेऊ शकता. तुम्ही दिवसातून ३-४ वेळा देखील बर्फाचा शेक घेऊ शकता. यामुळे आराम मिळेल. Ice pack for neck pain

टेक नेक हा जीवनशैलीशी निगडीत आजार असल्याने त्यावर उपाय करण्याएवजी तो होणार नाही यासाठी आधीच काळजी घेणं जास्त गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT