Bathing Tips sakal
लाइफस्टाइल

Bathing Tips: आंघोळ करताना तम्हीही या चुका करता का? अन्यथा त्वचेचं होऊ शकतं मोठं नुकसान

आंघोळ करताना जर तुम्ही देखील या चुका करत असाल तर त्वचेचं गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे.

Aishwarya Musale

दररोज स्वच्छ आणि ताजेतवाने राहण्यासाठी आपण दररोज आंघोळ करतो. पण त्याचवेळी काही गोष्टी अशा असतात ज्यांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. या छोट्या गोष्टी भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ, आपण असे म्हणू शकतो की आंघोळ करताना आपण रसायनयुक्त साबण आणि शॅम्पू आणि लूफा वापरतो. यामुळे आपली त्वचा खराब होते तसेच आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारालाही जन्म मिळू शकतो. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की अंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

ऋतूनुसार पाण्याचा वापर करावा. कारण खूप थंड किंवा गरम पाणी तुमची त्वचा कोरडी करू शकते. त्यामुळे गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा, तर थंड पाण्याऐवजी नॉर्मल तापमानाचे पाणी वापरा.

केमिकलयुक्त शॅम्पू आणि साबण वापरू नका

बाजारात अनेक प्रकारचे साबण उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की या स्किन केअर केमिकल प्रोडक्ट्समध्ये पॅराबेन आणि सल्फेट सारखी केमिकल मिसळली जाते. जे त्वचेसाठी खूप हानिकारक आहे.

तुम्ही किती तास अंघोळ करता हे महत्त्वाचे आहे

बाथरूममध्ये जास्त वेळ घालवणे योग्य नाही. लोकांना असे वाटते की आपण जितके जास्त वेळ आंघोळ करू तितकी अंगावरील घाण साफ होईल. जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचा खराब होते. आणि त्वचेशी संबंधित आजार होतात.

​मेक अप न काढणे

आंघोळीदरम्यान मेक अप काढण्याचीही चूक कधीच करू नका. कित्येक जणी आंघोळ करताना क्लिंझर किंवा फेसवॉशचा वापर करून मेक अप काढतात. पण आंघोळ करताना चेहऱ्यावरील मेक अप पूर्णपणे निघत नाही.

यासाठी आंघोळ करण्यापूर्वी योग्य पद्धतीनं क्लिंझरने मेक अप काढून चेहरा स्वच्छ करून घ्या. यानंतर चेहऱ्यावर बेबी ऑइल लावावे. लगेचच फेस वॉश किंवा साबणाचा वापर करू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT