Baby Girl Name  esakal
लाइफस्टाइल

Baby Girl Name : मुलींच्या नावातच झळकेल व्यक्तिमत्व अशी हटके नावं ठेवा, बघा संपूर्ण लीस्ट

हल्ली बाळ जन्माला येण्याच्या आधीपासूनच बाळाचे नाव काय ठेवावे याची चर्चा पालकांमध्ये होतान दिसून येते

सकाळ ऑनलाईन टीम

Unique Baby Girl Name : हल्ली बाळ जन्माला येण्याच्या आधीपासूनच बाळाचे नाव काय ठेवावे याची चर्चा पालकांमध्ये होतान दिसून येते. तुम्हाला मुलगी झाल्यास तुमच्या मुलीचे अगदी अर्थपूर्ण आणि नावातूनच व्यक्तिमत्व झळकणारे नाव ठेवायचे असेल तर ही नावाची लिस्ट नक्कीच तुमच्यासाठी फायद्याची ठरेल.

अमाया - जर तुमच्या मुलीचे नाव 'A' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव 'अमाया' ठेवू शकता. अमाया नावाचा अर्थ म्हणजे रात्रीचा सुखद पाऊस जो नवीन आशा आणतो. तुम्ही तुमच्या लहान मुलीसाठी हे गोंडस नाव निवडू शकता.

बुलबुल - अनेकजण आपल्या मुलीचे निक नेक बुलबुल असे ठेवतात. तुम्हाला तुमच्या एंजलचे क्यूट नाव ठेवायचे असेल ते हे नाव सुद्धा बेस्ट आहे.

हनीशा - तुम्ही 'H' अक्षराने सुरु होणारं नाव तुमच्या मुलीसाठी शोधत असाल, तर तुम्हाला हनिशा हे नाव आवडेल. हनिशा नाव तुमच्या मुलीसाठी युनिक आणि अर्थपूर्ण ठरेल. हनिशा नावाचा अर्थ आहे मधासारखी गोड.

जेमिशा - ज्या लोकांना बाळाची अनोखी नावे आवडतात त्यांना जेमिशा हे नाव आवडू शकते. हे नाव युनिक नावांच्या यादीतील एक नाव आहे. जेमिशा नावाचा अर्थ "रात्रीचा राजा किंवा अंधाराची राणी" असा आहे.

कुनिशा - ज्या लोकांना अनोखी नावे आवडतात त्यांना कुनिशा हे नाव देखील आवडू शकते. कुनिशा नावाचा अर्थ बुलबुल पक्षी असा आहे.

मधुनिशा - जर तुमच्या मुलीचे नाव 'M' अक्षराने सुरू होत असेल तर तुम्ही तिचे नाव मधुनिशा ठेवू शकता. मधुनिषा नावाचा अर्थ एक आनंददायी, आनंदी आणि सुंदर रात्र आहे. हे नाव तुमच्या मुलीसाठी युनिक आणि हटके ठरेल.

निरंजना - ज्या लोकांना पारंपारिक नावे आवडतात त्यांना निरंजना हे नाव आवडू शकते. निरंजना नावाचा अर्थ पौर्णिमेची रात्र किंवा नदी. माता दुर्गा यांना निरंजना या नावानेही संबोधले जाते. माता दुर्गेचे भक्त त्यांच्या मुलीचे नाव निरंजना ठेवू शकतात.

पोर्णिमा - पोर्णिमा हे मुलींचे लोकप्रिय नाव आहे. पौर्णिमा या नावाची क्रेझ अजूनही दिसून येते. ज्या रात्री चंद्र पूर्णपणे बाहेर येतो, म्हणजेच पूर्ण गोलाकार असतो, त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. पौर्णिमेच्या रात्रीचे आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. (New Baby)

त्रियमा - ज्या लोकांना युनिक आणि अर्थपूर्ण नाव हवं असेल त्यांच्यासाठी हे ऑप्शनसुद्धा बेस्ट ठरेल. त्रियमाचा अर्थ रात्र असा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना अखेर दिलासा! आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, उकाड्यापासून मिळणार आराम

2027 मध्ये प्रभासचे 'हे' बिग बजेट प्रोजेक्ट होणार रिलीज !

Chess Grandmaster Bobby Fischer Historic Match : खेळ की शास्त्र? अमेरिकेची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जेव्हा बॉबी फिशरने रशियाला नमवले!

Tanzania: टांझानिया : पूर्व आफ्रिकेतील नैसर्गिक संपत्तीचा महासाथी

Monsoon Update India : मॉन्सून वेगाने पुढे सरकतोय ! केरळमध्ये पुढील दोन दिवसांत होणार दाखल, महाराष्ट्र आगमन कधी ? अपडेट समोर

SCROLL FOR NEXT