Backed Kanda Bhaji  esakal
लाइफस्टाइल

Baked Kanda Bhaji : कधी ऑईल फ्री कांदा भजी खाल्ली का? माधुरी दीक्षित सांगतेय 5 प्रकारच्या रेसिपीज

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने लेकाबरोबर चाहत्यांनाही शिकवले हेल्दी कांदा भजी

धनश्री भावसार-बगाडे

Madhuri Dixit Nene Recipe Of Kanda Bhaji In Marathi : पावसाळा म्हटलं की, पहिले आठवतात ते कांदा भजी आणि मसाला चहा. याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितही अपवाद नाही. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी माधुरी चक्क पती आणि मुलासोबत मस्त गप्पा मारत मुलासहित चाहत्यांनाही कांदा भजी बनवण्याचे ५ प्रकार शिकवत आहे.

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पती डॉ. श्रीराम नेने यांच्या यूट्यूब चॅनलवर त्यांनी हा व्हिडीओ अपलोड केलेले असून माधुरी आणि डॉ. नेने दोघांच्याही इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चला तर जाणून घेऊया माधुरी दीक्षितकडून ऑईल फ्री कांदा भजीची रेसिपी.

यात माधुरीच्या फॅमिलीचे क्युट बाँडिंगही चाहत्यांना बघायला मिळत आहे. मुलाला भजी आणि चहा बनवायला शिकवताना ती दिसत आहे. त्यात पतीचाही तेवढाच उत्साहाने सहभाग हे देखणं उदाहरणही यानिमित्ताने माधुरीने चाहत्यांसमोर ठेवलं आहे.

यात डीप फ्राय, शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारे कांदा भजी बनवले असून सोबत मस्त मसाला चहा बनवला आहे.

माधुरी दीक्षित स्पेशल कांदा भजी

साहित्य

२ कांदे, २/३ कप बेसन, २ चमचे तांदळाचे पिठ, १/२ टीस्पून किसलेले आले, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट, १ चिमूट बेकींग सोडा, १ टीस्पून, २-३ चमचे पाणी.

कृती-

  • एका भांड्यात चिरलेला कांदा, बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, आले आणि हिरवी मिरची घालून पीठ तयार करा.

  • बॅटर तयार झाल्यावर त्यात बेकींग सोडा आणि थोडे तेल घाला. सगळं नीट मिक्स करा.

  • आवश्यक असल्यास आपण त्यात पाणी मिक्स करू शकतात.

  • बॅटर तयार झाल्यावर भजी बेक करा, डीप फ्राय करा, एअर फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करूनही खाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT