नेल आर्ट Esakal
लाइफस्टाइल

Nail Art ची पडतेय तरुण-तरुणींना भुरळ

आता, तरुणांनाही सौंदयने भुरळ घातली आहे. म्हणूनच तेही आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे बारकाईने लक्ष देऊ लागले आहेत. व्यक्तिमत्त्वामध्ये भर घालत असताना लहान-सहान गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये हाताच्या सौंदर्यालाही महत्त्व असते

सकाळ डिजिटल टीम

परिपूर्ण सौंदर्य मिळवण्याच्या खटाटोपात तरुणाई लहान- सहान बाबींकडेही बारकाईने लक्ष देते. याचाच एक भाग म्हणजे नखांचे सौंदर्य. हे सौंदर्य द्विगुणित करण्यासाठी नेल कल्चर आणि नेल आर्टचा Nail Art वापर होतो. Beauty Tips Marathi Know About Nail Art and Nail Culture

परिपूर्ण सौंदर्याची Beauty व्याख्या अद्याप तरी कुणालाही करता आलेली नाही. तरीही असे अनिमिष सौंदर्य मिळवण्याचा मोह तरुणाईला Youth टाळता येत नाही. म्हणूनच की काय, सौंदर्यसाधनेसाठी वेगवेगळ्या कौशल्यांचा आधार घेतला जातो. आतापर्यंत सौंदर्य ही तरुणींची मक्तेदारी होती.

आता, तरुणांनाही सौंदर्याने भुरळ घातली आहे. म्हणूनच तेही आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे बारकाईने लक्ष देऊ लागले आहेत. व्यक्तिमत्त्वामध्ये भर घालत असताना लहान-सहान गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामध्ये हाताच्या सौंदर्यालाही महत्त्व असते.

हाताचे सौंदर्य राखताना नखांकडे Nails दुर्लक्ष करून चालत नाही. आपली नखे नीट कापलेली, आकार दिलेली, आकर्षक नेलपॉलिशने Nail paint रंगवलेली असावीत, असे प्रत्येकीलाच वाटते. आजकाल तरुणही हातांची आणि नखांची सर्वतोपरी काळजी घेताना दिसतात; परंतु काहींची नखे पातळ आणि चटकन तुटणारी असतात. त्यामुळे नखे वाढवून ती व्यवस्थित आकारामध्ये ठेवण्याची इच्छा पूर्ण होत नाही.ह

हे देखिल वाचा -

त्यासाठी कृत्रिमपणे नखे वाढवण्याची पद्धत अवलंबता येते. कृत्रिम पद्धतीने नखे लावण्याच्या पद्धतीला नेल कल्चर म्हणतात. या तंत्रामध्ये काही तासांतच हाताच्या नखांना मनासारखा आकार आणि लांबी देता येते. काही रासायनिक पदार्थांचा उपयोग येथे लांबी वाढवण्यासाठी आणि आकार देण्यासाठी केला जातो. ही नखे अगदी खऱ्या नखांसारखीच दिसतात.

नेल कल्चरमध्ये अॅक्रॅलिक पावडर आणि लिक्विड पदार्थांचा वापर करण्यात येतो. ही नखे तयार करण्यासाठी एक ते दीड तास लागतो. नखे तयार केल्यानंतर पाच सहा महिने टिकतात. एक नख तयार करण्यासाठी दोनशे रुपये खर्च येतो.

नेल आर्ट म्हणजे नखांवर चित्रकारी, कलाकुसर करून नखांना आकर्षक बनवण्याची कला. आता फक्त नखांवर नेलपॉलिशच नाही, तर त्यावर विविध कलात्मक आकृत्या बनवून त्यात रंग भरले जातात, या कलेलाच नेल आर्ट असे म्हणतात. हे नेल आर्ट ड्रेसच्या रंगानुसार, डिझाईननुसार केले जाते.

त्यातील नक्षीवर मीनाकाम केले जाते. हे वर्क रंगाव्यतिरिक्त मोती, खडे, रंगीत पंख आणि कुंदननेही केले जाते. ही एकदा काढलेली डिझाईन एक महिन्यापर्यंत तशीच राहू शकते. नेल आर्टची किंमत वापरलेल्या वस्तूंवर ठरवली जाते. या नेल आर्टला तरुणाईकडून चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT