Hair Care Tips Sakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसगळती रोखण्यासाठी या पानांचा वापरा हेअरमास्क, केस होतील लांबसडक

​​Hair Care Routine In Marathi : मोरिंगा झाडाच्या पानांपासून हेअरमास्क तयार केला जाते. या मास्कच्या वापरामुळे केसांची वाढ चांगली होती.

सकाळ डिजिटल टीम

कंगवा करताना तुमचेही केस गळतात का? या प्रश्नाचं उत्तर हो असे असेल तर, या समस्येवर आपण वेळीच उपाय करणं आवश्यक आहे. केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे, पण जर केसगळती होऊन नवीन केस येत नसतील तर मग आपण यावर लागलीच उपाय करा अन्यथा टक्कल पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 

केसांचे तुटणे, केसगळती यावर आपण काही रामबाण घरगुती उपायही करू शकता. यापैकी एक उत्तम उपाय म्हणजे शेवग्याच्या पानांचे हेअरमास्क. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिज हे गुणधर्म असतात. या पानांमध्ये संत्र्यापेक्षा सातपट अधिक व्हिटॅमिन सी आणि दुधापेक्षा चारपट अधिक कॅल्शियम असते.

तर कॅरेटीनचे प्रमाण गाजरपेक्षा चारपट अधिक आहे. म्हणूनच शेवग्याची पाने केसगळती व केसांचे तुटणे यासारख्या समस्येवर रामबाण उपाय आहेत. 

केसगळती-टक्कल पडण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उपाय  

केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा हेअरमास्क हा एक नैसर्गिक उपाय आहे. या पानांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिज यासारख्या पोषकघटकांचा समावेश असतो, ज्यामुळे केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते.  

शेवग्याच्या पानांमध्ये ‘व्हिटॅमिन ए’चा मोठ्या प्रमाणात साठा आहे, या पोषणतत्त्वामुळे टाळूची त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. यामध्ये फॅटी अॅसिड देखील आहे, जे केसांच्या वाढीस पोषक असते. याव्यतिरिक्त पानांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, ओमेगा 3, फॉलेट आणि फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचे प्रमाण भरपूर आहे. ज्यामुळे केसांचे नुकसान होत नाही.

शेवग्याच्या पानांचे हेअरमास्क कसे तयार करावे?

  • शेवग्याची पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा.

  • या पेस्टमध्ये आता खोबरेल तेल मिक्स करा. 

  • दोन्ही सामग्री व्यवस्थित मिक्स व मास्क केसांवर लावा. 

  • 10 मिनिटे हेअरपॅक केसांवर लावा आणि यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT