heena khan  esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips : हिना खानच्या ग्लोइंग स्कीनचं सिक्रेट आहे बाल्कनीत

स्किन टाइटनिंगसाठी हिना खानचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अभिनेत्री हिना खानचे लाखो फॅन्स आहेत. सौंदर्य आणि अभिनयातील सहजता यामुळे तिची ‘ये रीश्ता क्या केहलाता है’, या सिरीअलचे आजही चाहते आहेत. हिना फिटनेस आणि नैसर्गिक सौदर्य प्रसाधनांचा अधिक महत्त्व देते. तिच्या होम रेमिडीज ती सोशल मिडीयावर शेअर करत असते.

हिना खानची ग्लॅमरस त्वचा आणि रेडिएंट ग्लो मिळवण्यासाठी घरगुती उपाय करते. केमिकल युक्त प्रोडक्ट चेहऱ्यावर तात्पुरते फरक पाडतात. पण, लाँग लास्टिंग ग्लोसाठी होम रेमिडीज कराव्यात असा तिचा सल्ला आहे.

हिना तिची त्वचा निरोगी आणि स्पॉट विरहित ठेवण्यासाठी कोरफडच्या क्यूब्सचा वापर करते. हिनाने तिच्या घराच्या बाल्कनीमध्ये कोरफडीचे रोप लावले आहे. फ्रेश कोरफडी क्युब्स घरी तयार करते. याच्या वापराने फक्त 5 मिनिटांत चेहरा तजेलदार होते.

असे बनवा कोरफडीचे क्युब्स

कोरफडीचे क्युब्स बनवण्यासाठी ताजी कोरफड घ्या.

कोरफडीचे पान एका बाजूने सोलून घ्या.

आता त्याचे चौकोनी तुकडे करा आणि फ्रिजमध्ये ठेवा.

15 ते 20 मिनिटांनंतर या थंड तुकड्यांनी चेहऱ्यावर मसाज करा.

असे तुकडे बनवून फ्रीजला ठेवू शकता. ज्यामुळे घाईच्यावेळी ते वापरता येतात.

स्किन टाइटनिंगसाठी हिनाचा सल्ला

हिनाचे असे म्हणणे आहे की, स्किन टाइटनिंग असेल तर चेहरा तरुण राहतो. यासाठी हिना चेहऱ्याला मसाज करण्याचा सल्ला देते. चेहऱ्याच्या मसाजसाठी बदाम तेल, व्हिटॅमिन-ई कॅप्सूल, मलई आणि खोबरेल तेल वापरता येते.

चमकदार त्वचेसाठी

हिनाच्या ग्लोइंग स्किनचा राज असा आहे की, ती कोणतेच प्रोडक्ट सतत वापरत नाही. नेहमी परिणाम देणाऱ्या गोष्टी वापरते. चेहऱ्यावर वातावरणानुसार बदल होत असतात. त्यामुळे एकच क्रीम किंवा प्रोडक्ट वापरणे चुकीचे असल्याचे ती म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT