Beauty Tips for Tanning  esakal
लाइफस्टाइल

Beauty Tips for Tanning : महागड्या पार्लर ट्रीटमेंटने नाही तर फक्त एक चमचा कॉफीने करा टॅनिंग दूर..

टॅनिंग ही सध्या खूप मोठी समस्या

सकाळ डिजिटल टीम

Beauty Tips for Tanning : टॅनिंग ही सध्या खूप मोठी समस्या आहे; बाहेरचे प्रखर उन, सतत बदलणार हवामान, धूळ, माती अनेक कारणांमुळे हात काळे दिसू शकतात. कॉफी या समस्येपासून मुक्त व्हायला मदत करते.

अशा प्रकारे हातांची टॅनिंग दूर होईल

सूर्यप्रकाशामुळे सर्वात आधी टॅनिंग ज्यांना होते ते म्हणजे आपले हात; आपले हात नेहमी सूर्यप्रकाशाच्या लक्ष्यावर असतात. शिवाय हातांवर धूळ मातीही लवकर पसरते. अशा परिस्थितीत हातावर दिसणारा काळेपणा दूर करणे आवश्यक वाटते.

कॉफीच्या सहाय्याने हातांचा काळेपणा किंवा टॅनिंग दूर करता येतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी कॉफीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. हे एक चांगले एक्सफोलिएटर आणि क्लिन्झर म्हणून देखील काम करते.

1. कॉफी आणि दही

हातावरील काळेपणा दूर करण्यासाठी कॉफी आणि दही मिसळून डेटन स्क्रब बनवता येतो. ते बनवण्यासाठी एका भांड्यात एक चमचा कॉफी घ्या आणि अर्धा चमचा हळद हळद मिसळा. यानंतर त्याची पेस्ट तयार होईल इतके दही टाकून मिक्स करा. आता हात स्वच्छ धुवून घ्या आणि हे स्क्रब काही वेळ हातावर मसाज केल्यासारखे घासून घ्या 20 मिनिटांनंतर हात साध्या पाण्याने धुवून घ्या. हे असे आठवड्यातून दोनदा करणे जास्त फायदेशीर ठरते.

2. कॉफी आणि ऑलिव्ह ऑइल

एका भांड्यात कॉफी घ्या आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटे हातावर लावल्यानंतर स्वच्छ धुवा. हातातील टॅनिंग दूर करण्यासोबतच त्वचा मुलायमही बनते. तुम्ही हा पॅक बनवून चेहऱ्यावरही लावू शकता.

3. कॉफी आणि मध

हातावर दिसणारे पिगमेंटेशन कमी होण्यासाठी कॉफीमध्ये मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट हातावर सुमारे 15 ते 20 मिनिटे तशी हातावर ठेवा. कॉफी हात स्वच्छ करेल, तर मध हातांना आवश्यक ओलावा देईल. सन टॅनिंग दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.

4. कॉफी आणि लिंबू

व्हिटॅमिन सी ने भरपूर लिंबाचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. एक वाडगा घ्या, त्यात लिंबाचा रस घाला आणि नंतर दीड चमचे कॉफी मिसळा आणि हातांना लावा. 15 मिनिटांनंतर तुमचे हात धुतल्यानंतर तुम्हाला सौम्य प्रभाव दिसू लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आशा भोसलेंची कशी आहे प्रकृती? तब्येतीबाबत पंतप्रधान मोदींची पोस्ट, नातीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली, 'चेस्ट इन्फेक्शनमुळे...'

Breaking News Live Update: अलिबागच्या नागाव बिचवर रोबो रक्षक तैनात

IPL 2026: लखनौचा चौधरी केंद्रस्थानी; गुजरात टायटन्स संघाविरुद्ध आज सामना, कशी असेल प्लेइंग-११

Nanded News: माहूर तालुक्यातील अवैध वाळू उत्खननासाठी पैनगंगा ‘आंदण’; ट्रेझर बोटींसह जेसीबी व पोकलँड मशीनचा वापर, पर्यावरणाला धोका

Asia Badminton Championship: भारताच्या आयुष शेट्टीची अंतिम फेरीत धडक; वर्ल्ड चॅम्पियनला हरवून आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये

SCROLL FOR NEXT