Bed Rotting Trend
Bed Rotting Trend Esakal
लाइफस्टाइल

तुम्ही देखील दिवसभर बेडवर लोळत पडताय? मग सावधान, आरोग्यासाठी Bed Rotting ट्रेंड पडू शकतो महागात

Kirti Wadkar

सोशल मीडियावर कायमच नवेनवे ट्रेंड पाहायला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावरील Social Media हे ट्रेंड लाखोंच्या संख्येत फॉलो देखील केले जातात. एवढचं नव्हे तर एखादा ट्रेंड आला कि त्यासाठी आपल्या इतर मित्र मैत्रिणींना चॅलेंज देऊन तो फॉलो करण्यासही सांगितलं जातं. Bed Rotting full day may be harmful for mental and physical health

सध्या सोशल मीडियावर बेड रोटिंग Bed Rotting हा एक आगळा वेगळा ट्रेंड पाहायला मिळतोय. रोजच्या कामाच्या आणि धकाधकीच्या जीवनातून स्वत: वेळ देता यावा एखादा दिवस काहीच न करता केवळ आराम Rest करावा या कल्पनेतून हा ट्रेंड सुरु झाला.

बाहेरच्या जगाशी संबंध तोडून एक दिवस फक्त अंथरुणात लोळत पडावं असं अनेकांना वाटतं. यालाच बेट रोटिंग म्हंटलं गेलंय. शरीराला आरामाची गरज नक्कीच असते. मात्र अनेकदा दिवसभर बेटवर झोपून राहणं हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.

सध्या सोशल मीडियावर अनेकजण Bed Rotting ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. बेडवर झोपल्याचे रिल्स किंवा पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

मानसिक आरोग्य येऊ शकतं धोक्यात

खरं तर बेट रोटिंग ही एक ठरवून केलेली क्रिया आहे. म्हणजे एखादी व्यक्ती ठरवून एखादा दिवस किंवा काही दिवस काहीच काम न करता दिवसभर केवळ बेडवर झोपून घालवते. अशावेळी कामाव्यतिरिक्त गाणी ऐकणं, सिनेमा पाहणं किंवा मित्र-मैत्रिणींची गप्पा मारण्यात दिवस घालवला जातो.

जर बेड रोटिंग हे केवळ एका दिवसापुरतं मर्यादित असेल तर तुम्हाला आराम नक्की मिळेल. मात्र २-३ किंवा जास्त दिवस चालल्या त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होवू शकतो. दिवसभर बेडवर पडून राहिल्याने मूड स्विंग्स होतात. यामुळे तणाव वाढू शकतो.

एवढचं नव्हे तर यामुळे एकाकीपणा वाढून नैराश्य देखील येऊ शकतं. बेड रोटिंगमुळे मानसिक समस्या वाढू शकतात.

हे देखिल वाचा-

बेड रोटिंगमुळे आरोग्य धोक्यात

बेट रोटिंग म्हणजेच दिवसभर कोणतंही काम न करता बेटवर झोपून राहिल्य़ास किंवा लोळत राहिल्यास कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढू शकतो. तसचं यामुळे शरीराच्या स्नायूंमध्ये वेदना निर्माण होवू शकतात. कालांतराने तुम्हाला अशक्त आणि आजारी असल्याची भावना येऊ शकते.

तसंच दिवसभर बेडवर राहिल्याने तुम्ही सक्रिय नसता. यामुळे सुस्ती येते आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. तसचं मेटाबोलिज्मवर याचा परिणाम झाल्याने पचनासंबधीच्या समस्या वाढू शकतात.

एकंदरच दिवसभर निष्क्रिय आणि लोळत राहिल्याने आरोग्याच्या अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे बेट रोटिंग हा ट्रेंड तुम्हाला आराम देण्याएवजी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT