Benefits of Mayurasana esakal
लाइफस्टाइल

Benefits of Mayurasana : शरिरीक वेदनांपासून ते मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंत.. मयूरासन आहे फायदेशीर, जाणून घ्या योग्य पद्धत

Benefits of Mayurasana : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. योगामध्ये विविध प्रकारची योगासने आहेत. या योगासनांचे फायदे देखील अनेक आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Mayurasana : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती योगा करू शकतात. शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा अतिशय प्रभावी आणि फायदेशीर आहे.

योगामुळे आपल्या शरीराला आंतरिक ऊर्जा मिळते आणि शारिरीक समस्यांपासून आराम देखील मिळतो. योगामध्ये विविध प्रकारची योगासने आहेत. या योगासनांचे फायदे देखील अनेक आहेत.

या योगासनांपैकीच एक असलेले आसन म्हणजे मयूरासन होय. या योगासनाचा नियमित सराव केल्याने अनेक शारिरीक आणि मानसिक आजारांपासून आपल्याला आराम मिळतो. शिवाय, पोटाशी संबंधित असलेल्या आजारांपासून देखील आराम मिळतो. मयूरासन योगासन केल्याने पोटाच्या समस्येसोबतच, शारिरीक आणि मानसिक समस्या दूर होण्यास मदत होते.

आज आपण हे मयूरासन करण्याची योग्य पद्धत कोणती? आणि या योगासनाचा नियमित सराव केल्याने होणारे फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

मयूरासन करण्याची योग्य पद्धत कोणती ?

  • मयूरासन या योगासनाच्या नावावरून हे आपल्या लक्षात येते की, या आसनाची स्थिती ही मोरासारखी असते.

  • हे योगासन करताना आपल्या शरीराची स्थिती ही मोरासारखी दिसते. हे योगासन करायला अवघड जरी असले तरी त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे, या योगासनाचा सराव हा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावा.

  • मयूरासन करताना सर्वात आधी योगा मॅटवर गुडघे टेकवून बसा. त्यानंतर, तुमचे दोन्ही हात जमिनीवर ठेवा.

  • आता दोन्ही हातांची बोटे पाठावर ठेवून पाय जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर, तुमचे दोन्ही हात गुडघ्यांमध्ये ठेवा आणि हाताचे कोपर पोटावर व्यवस्थितरित्या सेट करा.

Mayurasana
  • त्यानंतर, हातांचे कोपर नाभीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमचे दोन्ही पाय मागे न्या आणि सरळ रेषेत ठेवा. त्यानंतर, तुमचे शरीर पुढे वाकवताना शरीराचा संपूर्ण भार दोन्ही हातांवर आणण्याचा प्रयत्न करा.

  • आता हातांवर संतुलन साधताना शरीर वरच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न करा.

  • या स्थितीमध्ये तुमचे हात केवळ जमिनीला समांतर असतील बाकी तुमचे संपूर्ण शरीर हवेत असेल.

  • तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही या योगासनात जास्त वेळ राहू शकता. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

मयूरासनाचे फायदे कोणते ?

  • हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही मयूरासनाचा सराव करू शकता. या योगासनामुळे खांदे, कोपर, मनगट आणि पाठीचा कणा मजबूत होण्यास मदत होते.

  • या योगासनाचा नियमित सराव केल्याने पचनक्षमचा सुधारते आणि पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.

  • मधुमेहींसाठी मयूरासन हे योगासन लाभदायी आहे. कारण, या योगासनाचा सराव केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT