Benefits of Uttanasana esakal
लाइफस्टाइल

Benefits of Uttanasana : डोकेदुखी आणि निद्रानाशच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा ‘हे’ योगासन, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Benefits of Uttanasana : उत्तानासन हे योगासन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits of Uttanasana : निरोगी जीवनशैलीसाठी नियमितपणे योगा आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आजकाल लोक आरोग्याप्रती चांगलेच जागरूक झाले आहेत. त्यामुळे, योगा, व्यायाम, वर्कआऊट आणि उत्तम आहार यावर भर दिला जात आहे. निरोगी आरोग्यासाठी योगा अतिशय फायदेशीर आहे. या योगासनांमध्ये विविध आसनांचा समावेश आढळून येतो.

या योगासनांपैकीच एक असलेले उत्तानासन हे आसन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळतो. शिवाय, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यास मदत होते. या योगासनाला ‘स्टॅंडिग फॉरवर्ड बेंड पोझ’ किंवा इंग्रजीमध्ये ‘इंटेन्स स्ट्रेच पोझ’ असे ही म्हटले जाते.

उत्तानासन हा संस्कृत शब्द आहे. तीव्र ताणलेली मुद्रा असा या शब्दाचा अर्थ आहे. या योगासनाचा सराव केल्याने शरीराला विविध प्रकारचे फायदे मिळतात. आज आपण हे उत्तानासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे जाणून घेणार आहोत.

उत्तानासन करण्याची योग्य पद्धत कोणती ?

  • सर्वात आधी योगा मॅटवर सरळ उभे राहा आणि तुमचे दोन्ही हात मांड्यावर ठेवा.

  • आता श्वास आत घेत कंबर वाकवून पुढे झुकवण्याचा प्रयत्न करा.

  • त्यानंतर, तुमच्या पायांचे घोटे दोन्ही हातांनी पकडा आणि दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा.

  • या दरम्यान तुमची छाती पायांना स्पर्श करेल.

  • त्यानंतर, तुमच्या दोन्ही पायांच्या मांड्या आतमध्ये दाबण्याचा प्रयत्न करा आणि टाचांवर शरीर स्थिर करण्याचा प्रयत्न करा.

  • आता तुमचे डोके टेकवा आणि दोन्ही पायांच्या मध्ये पाहा.

  • त्यानंतर, 10-15 सेकंद या स्थितीमध्ये राहा आणि हळूहळू सुरूवातीच्या सामान्य स्थितीमध्ये परत या.

उत्तानासन करण्याचे फायदे

  • या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने मांड्या, पाठ, कंबर आणि नितंबातील स्नायू मजबूत होतात.

  • दररोज हे योगासन केल्याने मेंदू मजबूत होतो आणि मन शांत राहते.

  • शिवाय, ताण-तणावापासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. फक्त याचा न चुकता सराव करणे गरजेचे आहे.

  • उत्तानासनाचा नियमितपणे सराव केल्याने डोकेदुखी आणि निद्रानाशाची समस्या दूर होण्यास मदत होते.

  • या योगासनाचा दररोज सराव केल्याने उच्च रक्तदाब, दमा आणि सायनुसायटिस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT