walking sakal
लाइफस्टाइल

Walking Barefoot On Grass: सकाळी गवतावर अनवाणी पायांनी चालल्याने सुधारेल आरोग्य, हे आहेत फायदे

सकाळी अनवाणी पायांने चालण्याने मनाला देखील विश्रांती मिळते.

Aishwarya Musale

सकाळी चालणे आणि जॉगिंग करणे आरोग्यासाठी चांगले असते. यामुळेच लोक सकाळी जॉगिंग करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का की सकाळच्या वेळी ताज्या हवेत हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालणे किती फायदेशीर आहे. ही एक प्रकारची ग्रीन थेरपी आहे.ज्याला फॉलो केल्याने तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. जाणून घेऊया सकाळी सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायांनी चालण्याचे फायदे.

सकाळी गवतावर अनवाणी पायांनी चालण्याचे फायदे

1. जर तुम्ही सकाळी गवतावर अनवाणी पायांनी चालत असाल तर तुम्हाला शांत झोप लागते. गवतावर अनवाणी पायांनी चालणे झोपेची गोळी म्हणून काम करते. जर तुम्ही रोज सकाळी अर्धा तास अनवाणी मॉर्निंग वॉक करत असाल तर तुमच्या झोपण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होतो.

2. गवतावर अनवाणी चालण्याने देखील तुम्हाला तणावापासून आराम मिळतो. जेव्हा तुम्ही हिरव्यागार वातावरणात राहता तेव्हा तुम्हाला शांतता वाटते. त्यामुळे तुमचा मूड चांगला होतो. मन अ‍ॅक्टिव्ह होते.

3. हिरव्या गवतावर अनवाणी चालणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेव्हा तुम्ही हिरव्यागार वातावरणात श्वास घेता तेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि तुम्हाला बरे वाटते.

4. नियमितपणे गवतावर अनवाणी पायांनी चालण्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसेच हृदयविकारांपासून दूर राहण्यास मदत होते.

5. रक्तदाबाच्या समस्येतही गवतावर अनवाणी चालणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे अॅक्युपंक्चर पॉइंट खूप सक्रिय होतो आणि तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय होते, जे निरोगी राहण्यास मदत करते.

6. रोज सकाळी गवतावर अनवाणी चालण्याने दृष्टी सुधारते. खरे तर चालताना तुमच्या शरीराचा संपूर्ण दबाव पायाच्या बोटांवर पडतो, त्यामुळे दृष्टी वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT