Yoga For Sinus Problems esakal
लाइफस्टाइल

Yoga For Sinus Problems : ‘या’ योगासनांचा नियमितपणे सराव केल्याने सायनसच्या समस्येपासून मिळेल आराम

Yoga For Sinus Problems : आजकाल सायनस ही एक सामान्य समस्या बनली आहे. वातावरण बदलले की सायनसच्या रूग्णांना लगेच त्रास होऊ लागतो.

Monika Lonkar –Kumbhar

Yoga For Sinus Problems : आजकाल सायनस ही एक सामान्य समस्या बनली आहे. वातावरण बदलले की सायनसच्या रूग्णांना लगेच त्रास होऊ लागतो. त्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. खास करून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात सायनसच्या रूग्णांना जास्त त्रास होतो. सर्दी, सूज, श्लेष्मा, डोकेदुखी आणि आवाजात बदल यांसारख्या समस्या त्यांना उद्भवतात.

या आजारात औषधोपचार केल्यानंतर ही सायनसच्या रूग्णांना लवकर आराम मिळत नाही. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. सायनसची समस्या दूर करण्यासाठी योगा फायदेशीर आहे. विविध प्रकारच्या समस्यांसाठी योगासनांचे अनेक प्रकार करता येतात. त्याचप्रमाणे, सायनसच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी काही योगासने ही फायदेशीर आहेत. कोणती आहेत ही योगासने? चला तर मग जाणून घेऊयात.

पवनमुक्तासन

या योगासनाचा नियमितपणे सराव केल्याने आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. त्यासोबतच सायनसच्या समस्येपासून आराम मिळतो. या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर पाठ टेकून झोपा. आता दीर्घ श्वास घ्या आणि तुमच्या एका पायाचा गुडघा वाकवून दोन्ही हातांची बोटे काही अंतरावर ठेवून दोन्ही पायांचे गुडघे पोटाजवळ आणा.

त्यानंतर, आता श्वास सोडताना डोके वरच्या बाजूला उचला आणि गुडघे नाकावर ठेवा. आता तुमचा श्वास रोखून धरा आणि १५ सेकंद या स्थितीमध्ये राहा. तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. त्यानंतर, तुमचे पाय सरळ ठेवा. आता हीच प्रक्रिया दुसऱ्या पायाने करा आणि पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

पश्चिमोत्तानासन

सायनसच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे योगासन सर्वात फायदेशीर आहे. मात्र, या योगासनाचा तुम्हाला नियमितपणे सराव करावा लागेल. या योगासनाचा सराव करण्यासाठी सर्वात आधी योगा मॅटवर दोन्ही पाय सरळ पसरून सरळ रेषेत एकमेकांच्या जवळ ठेवा.

त्यानंतर, तुमचे दोन्ही हात वरच्या दिशने न्या आणि तुमची कंबर सरळ ठेवा. त्यानंतर, वाकून दोन्ही हातांनी तुमच्या पायांची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान, तुमचे दोन्ही गुडघे वाकता कामा नये, ते ताठ असायला हवेत. त्यामुळे, ते शक्य तितके ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीमध्ये १० सेकंद रहा. त्यानंतर, पुन्हा सामान्य स्थितीमध्ये या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Human GPS : समंदर चाचा उर्फ ह्युमन GPSला कंठस्नान, १०० पेक्षा जास्तवेळा दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी केलीय मदत

Maratha Protest: मुंबईचं नाक पकडलं तरच आरक्षणाचं तोंड उघडेल, आंदोलकांचा निर्धार

Ganeshotsav 2025: कधी अन् कुठं झाली 'एक गाव, एक गणपती' ची सुरुवात? या कारणामुळे घेण्यात आला होता निर्णय!

Latest Marathi News Updates: रस्त्यावर कबड्डी खेळून मराठा आंदोलकांनी वेधले सर्वांचे लक्ष

PKL12: पहिल्या टाय ब्रेकरममध्ये पुणेरी पलटनने मारली बाजी! आदित्य- पंकज चमकले

SCROLL FOR NEXT