Black Salt Health Benefits
Black Salt Health Benefits 
लाइफस्टाइल

Black Salt Health Benefits : काळं मिठ लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर, पण याच पद्धतीने खा!

Pooja Karande-Kadam

Black Salt Health Benefits : मीठ प्रमाणात खाल्ल तरं त्याचे अनेक फायदे आहेत. पण, त्याच थोडं जरी प्रमाण वाढलं तरी अनेक आजार आपल्याला जडू शकतात. पण, एक मीठ असं आहे की जे खाल्ल्याने तुमचे आरोग्य अबाधित राहते.हे मीठ खाणं तुमच्या यकृताचे कार्य सुरळीत राहते.  

आज आपण काळं मीठ  म्हणूनही ओळखले जाते. त्याबद्दल माहिती घेणार आहोत. कारण, काळं मीठ खाण्याचे फायदे अनेक आहेत. ते काळं मीठ तुमच्या शरीरातील पीएच पातळी चांगली ठेवते.

पोटात निर्माण होणाऱ्या एसिडीक रसाला ते शोषुन घेत आणि आपल्या यकृताची काळजी घेत. त्यामुले ज्यांना सतत ऍसिडीटीचा त्रास होतो, अशा लोकांसाठी हे मीठ म्हणजे वरदानच आहे.

हे काळे मीठ अनेक पदार्थात मिसळून खाणेही फायद्याचं ठरणार आहे. दह्यासोबत याचे सेवन करणे आयुर्वेदातही चांगले मानले जाते. कारण, दही आणि मीठ एकत्र खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. तुम्ही काही दिवस जर न चुकता दही आणि मीठाचे सेवन केले तर तुमच्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात.

शरीरातील सर्व क्रीया, रक्ताभिसरण सुरळीत होते. दही आणि काळे मीठ एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात. तसेच ते कधी खावे याबद्दल जाणून घेऊ हे पाहुयात.

पोटासाठी फायदेशीर आहे

दही आणि काळे मीठ एकत्र खाणे सर्वाधिक फायद्याचे मानले जाते.  ते आपल्या शरीरातील PH पातळी सुधारते आणि जेवन पचवायला मदत करते. या व्यतिरीक्त आपली पचनसंस्था सुधारते त्यामुळे ब्लोटिंगची समस्या उद्भवत नाही.

ज्या लोकांना बद्धकोष्टतेचा त्रास असतो. अशांसाठी मीठ आणि दही खाणे उपयोगी पडते. कारण, याचे रोज सेवन केल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

वजन कमी करणे

बऱ्याच लोकांना वजन कमी करायचं असतं. अनेक प्रयत्न करूनही ते कमी होत नाही. अशावेळी दही मीठ तुमच्या मदतीला येईल. तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर दही आणि काळे मीठाचे सेवन करा.

कारण ते तुमच्या शरीराचे मेटॉबॉलिझम वाढवते आणि वजन कमी करायला मदत करते.दही सैंधव मीठ खाण्यामुळे पोटातील चरबी जळते. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होते.

यकृतासाठी फायदेशीर

दही आणि काळ्या मीठाचे सेवन यकृतासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे यकृताच्या पेशींना निरोगी बनवते आणि त्यांचे कार्य गतिमान करते. याशिवाय, ते यकृतातील गोठलेली चरबी काढून टाकण्यास मदत करते आणि यकृताच्या पेशींमध्ये जळजळ कमी करते.

याशिवाय फॅटी लिव्हरच्या समस्येवरही हे फायदेशीर आहे. त्यामुळे यकृत डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही दहीमध्ये काळे मीठ टाकून खाऊ शकता.

ब्लड शुगरसाठी फायदेशीर

काळे मीठ पाचनशक्ती तंदुरुस्त करून शरीराच्या पेशींपर्यंत पोषण देतात.यामुळे लठ्ठपणा कंट्रोल करण्यास मदत होते. शुगर असलेल्या रुग्णांनी सफेद मीठाऐवजी काळ्या मीठाचे सेवन केले पाहिजे. काळे मीठ शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत करतात.

लहान मुलांसाठी

काळे मीठ हे लहान मुलांसाठी सर्वाधिक फायदेशीर मानले जाते. यामुळे अपचन आणि कफ जमण्याच्या समस्यांमध्ये आराम मिळतो. आपल्या मुलाच्या जेवणात रोज थोडे काळे मीठ टाकल्याने पोटाच्या समस्या दूर होतात.

कमी प्रमाणात खावे काळं मीठ

काळे मीठ वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे. यातील खनिज अँटी बॅक्टेरियलचे काम करते. त्याच्यामुळे शरीरातील विषारी बॅक्टेरिया नष्ट होतात. काळ्या मीठामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते.

तसेच याच्या अधिक सेवनाने शरीरात क्रिस्टल तयार होतात. ज्यामुळे शरीरात दगड निर्माण होऊ शकतात. यासाठी याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT