blood sugar level control support by Multigrain idli made from flour dough food marathi news
blood sugar level control support by Multigrain idli made from flour dough food marathi news 
लाइफस्टाइल

चार पिठापासून तयार झालेली मल्टीग्रेन इडली तुम्हाला ब्लड शुगर लेव्हल ठेवण्यासाठी मदत करू शकते 

अर्चना बनगे

कोल्हापूर: डायबिटीज हा आजार आरोग्य जगतात चिंतेचा विषय बनला आहे. बदलती खाद्य संस्कृती ,मानसिक तणाव, आणि अन्य कारणाने या आजाराने अनेकांना त्रस्त करून ठेवले आहे. डायबिटीज एक असा आजार आहे,ज्यामध्ये  शरीरात ब्लड शुगर लेवल मध्ये कमी -जास्त होत असते. आपणा सर्वांना माहीत आहे की यावर अजून कोणताही उपाय निघालेला नाही. परंतु तुम्ही जेवणाच्या वेळा पाळताना योग्य वेळी जेवलात तरी या लक्षणांवर  कंट्रोल ठेवण्यास मदत होऊ शकते.

दररोज व्यायामा सोबत हेल्दी लाईफस्टाईल असणं महत्त्वाचे असते. रोज थोड्या थोड्या वेळाने खात रहा, कमी ग्लायसेमिक इंडेक्स सारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. . अन्नसाखळीमध्ये अशा काही उपाययोजना आहेत ज्या तुमच्या नियमित आहारामध्ये  सहभागी होऊ शकतात आणि शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. यातीलच आपणा सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे इडली. आणि हीच इडली आपल्याला पौस्टिक आणि शुगर फ्री बनवता येते आणि ती सुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने.


आपल्या दैनंदिन आहार मध्ये इडली हा अविभाज्य घटक बनला आहे. तुम्हाला तुमची आवडीची इडली सांबर स्वादिष्ट आरोग्यवर्धक डायबिटीज फ्रेंडली होण्यासाठी तुम्हाला आम्ही इडली कशी बनवावी हे आम्ही सांगू इच्छितो. आपण नियमितपणे  इडली बनविताना त्यामध्ये पांढरा तांदूळ  वापरतो. याऐवजी आपण घरात  पौष्टीक मल्टीग्रेन इडली बनवण्यासाठी अन्य धान्याचा चा उपयोग करू शकता.  डायबिटीस ला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी ज्वारी-बाजरी आणि नाचणी  याचा वापर करून ही पौष्टिक आणि स्वादिष्ट इडली तुम्ही बनवू शकता.

बेंगलोर बेस्ट न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर अंजू सुद यांनी अशा प्रकारच्या  इडली बाबत चांगले मत व्यक्त केले आहे.  तांदळा ऐवजी ज्वारी-बाजरी आणि नाचणी  याचा वापर चांगल्या गुणवत्तेची असते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात जे पचन संस्थेची मदत करतात ब्लड शुगर आणि वजन घटवण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. डायबिटीज असणाऱ्या लोकांना आहारमध्ये या पदार्थाचा समाविष्ट करण्याचा  नेहमी हा सल्ला दिला जातो. कारण ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम हे करत असतं.नाचणी ग्लायसेमिक इंडेक्स कमी करतो आणि पचनसंस्था चांगली ठेवतो शरीरातील शुगरनियंत्रित ठेवण्यास याचा चांगला उपयोग होतो. दुसरीकडे बाजरीमध्ये  कार्बोहाइड्रेट कमी आणि प्रोटीन ,फायबर,  अमीनो ऍसिड विटामिन आणि खनिजे असतात. हे सगळे ब्लड शुगर ला कमी  करण्यासाठी मदत करतात. न्यूट्रिशनिस्ट रुपाली दत्ता यांच्या मते  बाजरी हे एक मॅग्नेशियम स्त्रोत आहे जे डायबिटीस डायबिटीज कमी करण्यासाठी मदत करते.

या पिठांचा करा वापर

आपण घरच्या घरी आणि अत्यंत सोपी पद्धत वापरू शकत. मल्टी ग्रीन इडली बनवण्यासाठी काही नवीन करावे लागत नाही. तांदूळ च्या ऐवजी बाजरी मैदा आणि नाचणीचा वापर करा.  यामध्ये मेथीचा वापर करा. आणखी डायबेटिक फ्रेंडली पदार्थ बनण्यासाठी आपण यामध्ये वापर करू शकतो  ते म्हणजे उडीद. ज्वारी-बाजरी आणि नाचणी पिठाबरोबर  उडीद डाळ भिजवून घ्या.त्यात मिठाचा योग्य वापर करा.  मग हे मिश्रण रात्रभर भिजत घाला. हे मिश्रण मिक्स करून दहा मिनिटात आपली इडली तयार होते.

 अशी तयार करा  मल्टीग्रेन इडली 

एका बाऊल मध्ये दोन तासाकरता उडीद डाळ आणि मेथीचे दाणे एकत्र  भिजत ठेवा.डाळ आणि मेथी मधील पाणी बाजूला करून त्याला मिक्सरला फिरवून घ्या. अर्धा कप पाणी घालून पुन्हा एकदा त्याला मिक्सरला फिरवून घ्या. दुसर्‍या भांड्यामध्ये ज्वारी-बाजरी आणि नाचणीचे पीठ  एकत्र करा. त्यामध्ये एक कप पाणी घाला आणि ते चांगलं फेसाळून घ्या.  त्याच्या वरती झाकण ठेवून रात्रभर त्याला भिजू द्या. पीठ चांगलं भिजण्यासाठी त्याला वेगळा ठेवा.पीठ चांगलं भिजल्यानंतर त्याला मिक्सर मधून एकदा काढून घ्या.इडली करत असताना जितकं कमी तेल घालतात येईल तेवढं तेल कमी घाला. आणि मिक्सर मधून काढलेले एकत्र पिठाला  पंधरा मिनिटे त्याला उकडून घ्या. आणि गरमागरम सांबर सोबत सर्व्ह करा

असे वापरा घटक : 

नाचणी पिठ – ½ वाटी
 
बाजरी पिठ – ½ वाटी
 
ज्वारी पिठ – ½ वाटी

गव्हाचे  पिठ – ½ वाटी

मेथी दाणे- 2 चमचे

 तेल- 1चमचा

मीठ -गरजेनुसार

डिसक्लेमर: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT