Body Detox Remedies
Body Detox Remedies esakal
लाइफस्टाइल

Body Detox Remedies : पावसाळी साथीचे आजार मागं लावून घ्यायचे नसतील, तर  करण्याचे Body Detox फायदे जाणून घ्या!

Pooja Karande-Kadam

Body Detox Remedies : शरीर निरोगी ठेवण्यासाठी केवळ बाहेरून स्वच्छता ठेवणे आवश्यक नाही तर अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. ज्याला डिटॉक्सिफिकेशन असे म्हणतात. यामध्ये शरीरात साचलेली घाण वेगवेगळ्या प्रकारे बाहेर काढली जाते.

ज्यामुळे शरीराचे सर्व अवयव योग्यप्रकारे काम करू शकतात. शरीर ताजेतवाने आणि निरोगी राहते. यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगू शकता. डिटॉक्सिफिकेशनसाठी शरीरात मुख्यत: पाण्याची, हर्बल ड्रिंक्सची गरज असते. 

शरीर डिटॉक्स करणे खूप महत्वाचे आहे. कारण शरीर डिटॉक्स केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर चुकीच्या खाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार तुमच्या शरीराला घेरतात. (Body Detox Remedies : Detox the body like this in monsoon, diseases will stay away)

अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे शरीर डिटॉक्स केले तर तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की तुम्ही कोणत्या मार्गांनी बॉडी डिटॉक्स ठेवू शकता? तसेच खरंच याचा शरीराला काय फायदा होतो का? याची माहिती घेऊयात.

तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसतात का?

  1. नेहमी थकल्यासारखे वाटते.

  2. वाढतं वजन

  3. बद्धकोष्ठता

  4. निद्रानाश

  5. त्वचेवर ऍलर्जी  (Weigh Loss)

शरीर डिटॉक्स करण्याचे फायदे

  • नियमित डिटॉक्स केल्याने त्वचा चमकदार आणि प्रॉब्लेम फ्री होते.

  • शरीरातील विषारी घटक काढून टाकल्यामुळे शरीरावर सूज येत नाही.

  • त्यामुळे चयापचय गतिमान होतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  • डिटॉक्सच्या मदतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते.

  • किडनी, यकृत आणि पोटाचे आजार टाळण्यासाठी तुम्ही डिटॉक्सची मदत घेऊ शकता.

  • मानसिक आरोग्य सुधारते.

  • भूक चांगली लागते.

अशा प्रकारे शरीर डिटॉक्स होईल-

लिंबू

लिंबूमध्ये सोडियम, लोह आणि व्हिटॅमिन सी आढळते. दुसरीकडे, लिंबाचा रस शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतो. अशा स्थितीत शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही लिंबाची मदत घेऊ शकता. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की इम्युनिटी वाढवण्‍यासोबतच लिंबाचा रस toxins देखील सहज काढून टाकतो. म्हणूनच शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी प्या.

कोबी

तुम्हाला माहिती आहे का की कोबी तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने बॉडी डिटॉक्स होते. कारण कोबीमध्ये भरपूर फायबर आढळते. जे शरीरासोबतच पोटही निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही ते सॅलडमध्ये वापरू शकता. (Body)

नारळ पाणी

नारळाच्या पाण्याच्या मदतीने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन देखील होते. कारण नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यात सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते. याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते.

हे लक्षात ठेवा

घरगुती डिटॉक्स वॉटर अर्थात क्लीन्सिंग वॉटर- तुळस, पुदिना, आलं, लिंबू यांचा रोजच्या आहारात जरूर वापर करावा. त्यांचा रस, पाणी पिणं शरीरासाठी उत्तम आहे. या घरातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन करणाऱ्या पदार्थांमुळे पोटाचं संतुलन राखलं जातं. (Health Tips)

ज्यांना केवळ पाणी पिण्याचा कंटाळा आहे त्यांनी रोज तुळशीची पानं आणि लिंबाची फोड पिण्याच्या पाण्यात टाकून ते पाणी प्यावं. पुदिन्याची पानं, अळ्यांचा लहान तुकडा आणि अर्धे लिंबू यांचा ताजा रस करून नक्की प्यावा.

शरीर डिटॉक्स करायचे नसेल तर या गोष्टी पाळा

दिवसभर किमान तीन लिटर पाणी प्यावं (गरम, कोमट पाणी पिणं आवश्यक आहे). आर्द्रता असणाऱ्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. काकडी, पालेभाज्या, टोमॅटो, लिंबू याचा आहारात समावेश करावा.

नियमित व्यायाम करणं. खाण्यासोबतच व्यायाम केल्यानं तुमची चयापचय क्रिया उत्तम राहते. व्यायाम केल्यानंतर चहा-कॉफी पिणं कटाक्षानं टाळा. ही सवय सगळ्या आरोग्यदायी मेहनतीवर पाणी फिरवतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून केली निवृत्तीची घोषणा

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

SCROLL FOR NEXT