Brain Health Tips
Brain Health Tips esakal
लाइफस्टाइल

Brain Health Tips: तुमच्या या सवयी मेंदू करतात बाद; वेळीच स्वत:ला आवर घाला, नाहीतर...

Pooja Karande-Kadam

Brain Health Tips: मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग मानला जातो जो आपल्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो आणि शरीराच्या अवयवांना कोणतेही काम करण्यासाठी आज्ञा देतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या रोजच्या काही सवयींचा तुमच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो. चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल ज्यांचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो.

आपल्या दैनंदिन लाईफस्टाईलचा आणि वागण्याचा आपल्या मनावर खूप प्रभाव पडतो. दररोज व्यायाम केल्याने, पुरेशी झोप आणि संतुलित आहार घेतल्याने मेंदूच्या पेशींना भरपूर पोषक आणि ऑक्सिजन मिळतो. (Brain Health)

त्याचबरोबर खराब जीवनशैली, ताणतणाव, पुरेशी झोप न मिळणे आणि अस्वास्थ्यकर गोष्टींचे सेवन यामुळे स्मरणशक्ती आणि एकूणच मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

या सवयी तुमच्या मेंदूला हानी पोहोचवत आहेत

खराब लाईफस्टाईल

अशा लोकांचा मेंदू वेळेपूर्वी म्हातारा होऊ लागतो, जे नियमित व्यायाम करण्याऐवजी संपूर्ण वेळ सोफ्यावर बसून घालवतात. याचा तुमच्या एकूण आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्हाला हळूहळू अनेक आजार होऊ लागतात आणि तुमचा मेंदूही लवकर वृद्ध होतो. (Lifestyle)

पुरेशी झोप न घेणे

जे लोक रोज ७ ते ८ तास झोप घेत नाहीत, त्यांचा मेंदूही वेळेआधी वृद्ध होऊ लागतो. यासोबतच त्याचा प्रभाव तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. कमी झोपेमुळे तणावाची पातळीही खूप वाढते.

ताण-तणाव

तणावाचा मेंदूवरही खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे प्रभावित होते. अशा परिस्थितीत, तुमचा तणाव नियंत्रित करण्यासाठी तुम्ही दररोज ध्यान आणि योगासने करणे महत्त्वाचे आहे. (Stress)

खाण्यापिण्याची काळजी न घेणं

तुम्ही जे खातात त्याचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जास्त प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने तुमचा मेंदू आकुंचित होऊ लागतो. त्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाहही कमी होतो. जेव्हा योग्य प्रमाणात रक्त मेंदूपर्यंत पोहोचत नाही.

तेव्हा तुम्हाला ब्रेन स्ट्रोक सारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात अधिकाधिक फळे आणि भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.

ऑनलाइन खूप वेळ घालवणे

गेल्या काही वर्षांत लोकांचा स्क्रीन टाइम खूप वाढला आहे. एजिंग अँड मेकॅनिझम ऑफ डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संगणक आणि स्मार्टफोनमधून निघणारा निळा प्रकाश केवळ आपल्या डोळ्यांवर आणि त्वचेवरच नाही तर मेंदूवरही परिणाम करतो. निळा प्रकाश मेंदू आणि डोळ्यांच्या दोन्ही पेशींना हानी पोहोचवतो.

स्वत:ला या सवयी लावा

जिगसॉ पझलचे सर्व तुकडे एकत्र बसवायला खूप मेंदू लागतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही कोडे सोडवता तेव्हा तुमच्याकडे इतर तणावपूर्ण गोष्टींचा विचार करण्यासाठी पुरेशी मानसिक ऊर्जा उरलेली नसते. हे तुमच्या मेंदूचे सर्व भाग सक्रिय करते. ज्यामुळे तुमची संज्ञानात्मक क्षमता सुधारते आणि तुमच्या मेंदूला निरोगी राहण्यास मदत होते.

छंद

प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. तो जोपासण्याचा प्रयत्न करावा.जसे एखाद्याला वाचनाचा छंद असतो.तो ही मेंदूला गुंतवूण ठेवण्याचा चांगला मार्ग आहे.

गार्डनिंगमध्ये वेळ घालवा

रंगीबेरंगी फुले कोणाला आवडत नाहीत? ही फुले तुमच्या घराचे सौंदर्य तर वाढवू शकतातच शिवाय तुमचे मानसिक आरोग्यही सुधारू शकतात. स्वत:साठी किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी सुंदर फुलांची सजावट करणे, तसेच बाल्कनी आणि घराभोवती झाडे लावण्यात मेंदूला गुंतवूण ठेवा. (Gardening)

फिरायला जा

निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही कधीही फेरफटका मारण्याचा प्रयत्न केला नसेल, तर तुम्हाला आता ते करून पाहण्याची गरज आहे. निसर्गात वेळ घालवणे किंवा फेरफटका मारणे हे तुम्हाला तुमचे मन नकारात्मकतेपासून दूर ठेवण्यास मदत करू शकते. (Treaking)

यामुळे तुमचे मन ताजेतवाने होते आणि तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने विचार करू शकता. त्यामुळे हायकिंग, ट्रेकिंग किंवा धावणे यासारखी कोणतीही क्रिया तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT