Breast Cancer  esakal
लाइफस्टाइल

Breast Cancer : ब्रेस्ट कॅन्सरचा आजार बळावणार; २०४० पर्यंत लाखो महिलांचा होणार मृत्यू, The Lancet च्या सर्ह्वेत दावा

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

सकाळ डिजिटल टीम

Breast Cancer :

जगाच्या कोपऱ्यात असे आजार बाहेर पडत आहेत ज्याचा आपण कधीही विचार करू शकत नाही. कोरोना, झोम्बी यासारखे भयानक रोग येऊन गेल्यानंतर महिलांमध्ये एका रोगाची साथ वाढली आहे. कारण, अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेक्षणात २०४० पर्यंत लाखो महिलांचा मृत्यू होणार असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्ये आढळणारा हा कर्करोगाचा एक गंभीर प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. स्त्रियांमध्ये वाढती लठ्ठपणा, रेडिएशनच्या संपर्कात येणे आणि वाईट लाइफस्टाइलमुळे ही समस्या उद्भवते.

अलीकडेच, लॅन्सेटच्या अहवालात असे दिसून आले आहे की २०४० पर्यंत, स्तनाच्या कर्करोगामुळे लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. लॅन्सेट कमिशनच्या मते, गेल्या काही वर्षांत स्तनाचा कर्करोग हा एक सामान्य कर्करोग झाला आहे.

या अहवालानुसार, कमी उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना या समस्येचा अधिक सामना करावा लागू शकतो. २० ते ३० टक्के स्त्रिया ज्यांना स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाले आहे त्यांना पुन्हा हा आजार जडण्याची समस्या उद्भवू शकते. (Breast Cancer)

स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत?

  1. स्तनावर गाठी होऊ शकतात.

  2. स्तनामध्ये सूज येऊ शकते.

  3. कधीकधी स्तनाच्या आकारावरही परिणाम होऊ शकतो.

  4. निप्पलच्या आसपासच्या भागात वेदना जाणवू शकतात.

  5. तुम्हाला स्तनाग्रांमधून द्रव किंवा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. (Breast Cancer Symptoms)

अशी काळजी घ्या

  • स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आहार आणि जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

  • हा कर्करोग टाळण्यासाठी शारीरिक हालचाली वाढवा आणि नियमित व्यायाम करा.

  • यासाठी वेळोवेळी मॅमोग्राम चाचणी करत रहा.

  • स्तनांच्या कर्करोगापासून दूर राहण्यासाठी ड्रिंक्स पासून दूर राहणे आणि वजनावर नियंत्रण ठेवणे चांगले राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT