लाइफस्टाइल

नववधूचा हटके अंदाज; स्वत:चं कार चालवत पोहोचली सासरी

शर्वरी जोशी

लग्नात मुलीची पाठवणी करतांना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. आमच्या मुलीला सुखात ठेवा, काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करा, अशी करुण विनंती आई-वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका नववधूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नववधूच काय तर उपस्थित कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही. उलट सगळ्यांचेच उर अभिमानाने आणि आनंदाने भरुन गेल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एका नववधूने स्वत: कार चालवत सासरी गेल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

खरं तर लग्न झाल्यानंतर मुलीला तिच्या सासरची मंडळी मोठ्या धुमधडाक्यात घेऊन जातात. तिच्यासाठी खास वरातीचं आयोजन करतात. मात्र, कोलकात्ता येथे थोड्या नव्या पद्धतीची वरात पाहायला मिळाली. या वरातीत नवरदेव नवरीला घेऊन गेला नाही. तर, चक्क नववधूच तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या कुटुंबाला घेऊन गेल्याचं पाहायला मिळालं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक नववधू जराही न घाबरता किंवा गोंधळून न जाता बिंधास्तपणे कार चालवतांना दिसत आहे. कोलकात्ता येथे राहणारे स्नेहा सिंघी आणि सौगत उपाध्याय यांचं काही महिन्यांपूर्वीच लग्न झालं. लग्नसोहळा संपल्यानंतर पाठवणीच्या वेळी स्नेहा थेट ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसली आणि सीट बेल्ट बांधून गाडी चालवण्यास सज्ज झाली. या गाडीत तिच्या बाजूला तिचा नवरा आणि पाठीमागच्या सीटवर तिचे सासू-सासरे बसले होते. विशेष म्हणजे तिचं हे धाडस पाहून सासरच्या मंडळींनाही तिचा अभिमान वाटत होता.

दरम्यान, स्नेहा आणि सौगत यांचं लव्हमॅरेज असून जवळपास ८ वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे ज्यावेळी स्नेहा आणि सौगतची पहिली भेट झाली होती. त्यावेळीदेखील स्नेहानेच सौगतला तिच्या गाडीने घरी सोडलं होतं. त्यामुळे त्याचदिवशी त्यांनी निश्चिय केला होता की लग्नाच्या दिवशी स्नेहाच वरातीत गाडी चालवणार आणि त्यानुसार या दोघांनी केलंदेखील. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जवळपास ३.२ मिलिअन व्ह्यूज मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT