लाइफस्टाइल

नववधूने केला वर्ल्ड रेकॉर्ड; परिधान केला हजारो मीटर्सचा वेडिंग वेल

शर्वरी जोशी

लग्न म्हटलं की सगळीकडे आनंद आणि उत्साहाचं वातावरण असते. कामाची लगबग, लग्नाचा मुहूर्त यामध्ये घरातील सगळी मंडळी गढून गेली असतात. तर, उपस्थित पै-पाहुण्यांचं लक्ष नववधू आणि नवरदेवाकडेच असतं. यात अनेकदा नवऱ्या मुलीने परिधान केलेल्या कपड्यांची, तिच्या दागिन्यांची चर्चा महिलावर्गात होतांना दिसते. परंतु, ही चर्चा त्या समारंभापूरती किंवा ४-५ व्यक्तींपूरतीचं मर्यादित असते. मात्र, सायप्रस येथे राहणाऱ्या एका नववधूची चर्चा त्या लग्नसोहळ्यापूरती मर्यादित न राहता संपूर्ण जगात रंगली आहे. विशेष म्हणजे या नववधूने तिच्या लग्नात थेट वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
सायप्रस येथील मारिया परसकेवा या मुलीने तिच्या लग्नात रेकॉर्ड केला असून तिच्या या रेकॉर्डची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) करण्यात आली आहे. मारियाने परिधान केलेल्या वेडिंग गाऊनमुळे तिचा हा रेकॉर्ड झाल्याचं समोर आलं आहे.

मारियाने लग्नात परिधान केलेल्या वेडिंग गाऊनच्या वेलची लांबी जवळपास ६ हजार,९६२.६ मीटर असल्यामुळे त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा जगातला सगळ्यात मोठा वेडिंग वेल आहे. ६ हजार,९६२.६ मीटर म्हणजे साधारणपणे २२ हजार ८४३ फूट आणि २.११ इंच इतका लांब तो आहे.

वेडिंग वेल सेट करायला लागले ६ तास

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करावा ही माझी लहानपणापासूनची इच्छा होती. त्यामुळे मी ही हटके ट्रिक वापरली, असं मारिया म्हणाली. विशेष म्हणजे हा वेडिंग वेल मैदानात पसरवायला जवळपास ६ तास लागले. तसंच ३० वॉलेंटिअर्सने मिळून हा वेल मैदानात नीट पसरवला.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर मारियाच्या वेडिंग वेलची चर्चा रंगली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ४२ हजारांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT