bring shine for colored hair try this homemade hair mask lifestyle tips marathi news 
लाइफस्टाइल

कलर केलेल्या केसांसाठी शाईन आणायची असेल तर ट्राय करा हे होममेड हेअर मास्क

अर्चना बनगे

कोल्हापूर : केसांना कलर केल्यानंतर नेहमी केस ड्राय होतात. म्हणून खूप साऱ्या मुली कलर प्रोटेक्ट असणारे शाम्पू आणि कंडिशनर लावतात. महागड्या प्रोडक्ट ने केस चमकतात पण ही चमक खूप काळ टिकत नाही. शिवाय केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केसांचा कलर टिकवायचं असेल तर होम मेड मास्क वापरायला चालू करा. घरातल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचा वापर करून आपण केस मजबूत, चमकदार बनण्यासाठी मास्क तयार करू शकतो. आजच्या भागात आपण जाणून घेऊया घरच्या घरी हेअर मास्क कसे बनवायचे 

एवोकैडो फळाचा उपयोग

एवोकैडो नावाचे फळ केसांच्या  ग्रोथसाठी खूप फायद्याचे असते. हे फळ केसांमध्ये सॉफ्टनेस आणते. केसांचे तेलाचे बॅलन्स करते. यामध्ये खुप अशा अमिनो ऍसिडच्या मात्रा असतात जे केसांना प्रोटेक्ट करतात. केसांना मजबूत बनतात. यामध्ये विटामिन ए , बी ६, डी, आणि  इ व कॉपर आयरण केसांच्या स्कल्प हेल्दी ठेवतात आणि केस गळण्या पासून बचाव करतात.फ्री रॅडिकल्स ला बाहेर काढण्यासाठी हे मदत करतात शिवाय बंद हेअर फॉलिकल्सना ओपन करण्यास सुद्धा मदत करतात आणि ग्रोथ निर्माण करतात. कलर केलेले केस नेहमी कोरडे निर्जीव  दिसतात. म्हणून मास्क तयार करून लावा.

एवोकैडो आणि बदाम चे हेअर मास्क

बदामाच्या तेलामध्ये विटामिन एआणि विटामिन ई असते. हे तेल केसांच्या रंगासाठी आणि सुरक्षतेसाठी खूप उपयुक्त आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्यामुळे केसांना चांगला मास्क तयार होतो. या शिवाय यामध्ये लिंबूचा रस फायदेशीर ठरतो.

आवश्यक  सामग्री

एवोकैडो पल्प एक वाटी

बदाम तेल दोन चमचे

लिंबाचा रस एक चमचा


अशा पद्धतीने बनवा

मास्क पल्पला  मॅश करून द्या. या पल्प मध्ये बदामाचं तेल टाकून मिक्स करा. तयार मिश्रणामध्ये लिंबूचा रस घाला.

असे वापरा
आपल्या केसांच्या लांबीनुसार केसांना मिश्रणा लावून घ्या. 
केसांचा गुंता व्यवस्थित काढून संपूर्ण भागात विभाजन करून द्या. 
केसांच्या मुळापासून हेयर मास्क अप्लाय करा
.केसांना शॉवर कॅप घाला आणि तीस मिनिटे तसेच ठेवा
.हा मास्क थोडा सुकल्यानंतर माइल्ड शैम्पूने केस धुवा
. या मास्कचा वापर आठवड्यातून एकदाच करा

हेअर मास्क चे फायदे

हेयर मास्क मध्ये निंबू क्लिंजर सारखा काम करतो आणि केसांना स्वच्छ ठेवतो.
बदामाचे तेल केसांना मजबुती देते तर
एवोकैडो  केसांना सॉफ्ट  बनवतो
.एवोकॅडो हेअर हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि केसांवर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत परंतु केसांशी काही समस्या असल्यास ती वापरण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.

डिस्क्लेमर : ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

Pune News : राज्यातील ‘या’ चार विद्यापीठांच्या अधिनियमांत सुधारणेसाठी समिती स्थापन

Pravin Darekar: 'या' महिलांना महापालिकेची कामे द्यावीत, प्रविण दरेकर यांची मागणी

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

Tata Power: टाटाकडून मोठं गिफ्ट! तीन महिन्यात ४५ हजार घरात सौर प्रकाश

SCROLL FOR NEXT