Buddha Purnima 2024 esakal
लाइफस्टाइल

Buddha Purnima 2024: बाबासाहेबांनी केली होती बुद्ध जयंतीला सुट्टीची मागणी

Buddha Purnima 2024: नागपुरात ६ मे १९५५ रोजी पहिली बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Buddha Purnima 2024 : जगातील पहिला वैज्ञानिक आणि संशोधक तथागत गौतम बुद्ध होत. तथागताच्या वैज्ञानिक तत्वज्ञानावर जगभर संशोधन सुरू आहे. हा उघड्या डोळ्यांचा ‘बुद्ध’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ रोजी नागभुमीत लाखो लोकांना दिला. धम्मक्रांतीपूर्वी दिल्ली येथे सार्वजनिक बुद्ध जयंतीचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाला होता. विशेष असे की, बुद्ध जयंतीची सुट्टी जाहीर करण्यात यावी अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ साली तत्कालिन सरकारकडे केली होती.

सर्वच धर्म संस्थापकांच्या जन्मदिनी देशात सुट्टी मिळते. मग मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्ध यांच्या जयंतीस सुट्टी का नाही? एक तर नियोजित सुट्ट्यांतील एक सुट्टी कमी करा अथवा एक सुट्टी वाढवून आम्हाला द्या, अशी मागणी डॉ. आंबेडकरांनी तत्कालीन सरकारकडे केली होती. पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे बाबासाहेबांनी साजरी केली होती.

१९५१ मध्ये बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली ३ दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा झाला होता. दिल्लीनंतर मुंबईत बुद्ध जयंतीला १९५३ पासून सुरुवात बाबासाहेबांनीच केली होती. देशातील सार्वजनिक बुद्ध जयंती महोत्सवाचे प्रणेते बाबासाहेब ठरतात. १९५६ ला बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली होती, अशी नोंद धम्मचक्र टीमने केली आहे.

धम्मक्रांतीपूर्वीच कार्यक्रम

१९५५ सालची सकाळ. ६ मे चा दिवस होता. सकाळी ९ वाजता भिक्षु एस. सागर यांच्या उपस्थितीत बुद्ध दूत सोसायटीच्या कार्यलयात त्रिशरण घेण्यात आले होते. पूज्य भंते एस. सागर यांचे बौद्ध धम्मावर प्रवचन झाले होते. यापूर्वी सीताबर्डी येथील आनंदनगर येथील लक्ष्मण झगूजी कवाडे, भिक्षु एस . सागर यांना भेटले होते.

बुद्ध दूत सोसायटीचे सभासद मनोहर शहाणे उपस्थित होते. ७ मे १९५५ ला बाळकृष्ण मोहल्यात गोंडाणे भवनात इंदोरा शाखेत भंते सागर याच्या हस्ते उद्‍घाटन झाले. कंबोडियातील भिक्षु के. के. स्थितप्रज्ञ यांनी बौद्ध धम्मावर प्रवचन दिले होते. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलचे संस्थापक धम्मसेनानी वामनराव गोडबोले व सहकाऱ्यांनी नागपुरात प्रथम बुद्ध जयंती साजरी केली होती.

गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महानिर्वाण एकाच दिवशी झाले, यामुळे बुद्ध जयंतीला विशेष महत्व आहे. दु:ख निवारण्यासाठी बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितला आहे. याचे पालन समाजात व्हावे या हेतूने शंभरावर मुलांना शिक्षण देण्यापासून तर अनाथ मुलींचे लग्न लावून दिले. बाहेरून नागपुरात परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवण आणि निवाऱ्याची सोय केली जाते. गरीबांना रुग्णसेवेत मदत केली जाते. कोरोना काळात २५ लाख रुपयांचे गरजुनां धान्य वाटप केले. भदंत हर्षदीप, भदंत दीपंकरबोधी यांच्या सहकार्य मिळते.

-भन्ते अभय नायक, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT