Buddha Purnima 2024 sakal
लाइफस्टाइल

Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला द्या अशा हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक भारी मेसेज

बुद्ध जयंतीच्या हटके शुभेच्छांची लिस्ट वाचा...

सकाळ डिजिटल टीम

Buddha Purnima 2024 :

आज बुद्ध पौर्णिमा. वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यालाच बुद्ध जयंती असे सुद्धा म्हणतात. आजच्या दिवशी संपुर्ण जगात बुद्ध जयंती उत्साहाने साजरी केली जाते.

या बुद्ध जयंतीला अनेकजण एकमेकांना बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा पाठवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच बुद्ध जयंतीच्या हटके शुभेच्छांची लिस्ट सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Buddha Purnima wishes quotes status messages )

१. बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

२. एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा

३. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !

४. ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा

५. जीवनात संकट अडीअडचणी समोर आल्यावर गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे, विश्व वंदनीय महाकारूणिक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

६. शांतता ही नेहमी मनातुन प्राप्त होते तिचा बाहेर कुठेही शोध घेतल्यास ती कधीही प्राप्त होत नाही. बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

७. बुदध पौर्णिमेचा चंद्र आपल्या आयुष्यातील दुख दुर करून सुख शांती समाधान घेऊन येवो हीच माझी कामना, बुदध पौर्णिमेच्या मंगलमयी दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

८.  आज आहे बुद्ध पौर्णिमा ,आज चांगले वागण्याचा आणि चांगले बोलण्याचा संकल्प करूया.. बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

९. आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संकल्प करा ,सत्याची साथ सदैव द्या . कायम चांगले बोला . सर्वांशी मानवतेने वागा. बुद्ध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

१०. बुद्ध पौर्णिमेला आकाशात येणारा शितल चंद्र आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे करो आणि आपल्याला सुख समाधान आणि शांतता बहाल करो. आपणास व आपल्या कुटुंबास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT