Business Idea esakal
लाइफस्टाइल

Business Idea : जबाबदारीमुळे बाहेर पडताच येत नाही, तर करा बिर्याणी, सुक्क मटण अन् तर्रीदार रस्स्याचा बिझनेस

मोमोज अन् चायनिज फूडला आहे वेगळीच डिमांड

सकाळ डिजिटल टीम

Business Idea :

साधारण दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना आलेला. तेव्हा जगभरातील सगळेच व्यवसाय ठप्प झाले होते. त्याकाळात ना काम होतं ना हातात पैसा. अशा काळात कष्टकऱ्यांचे हाल झाले. तेव्हा नवऱ्याच्या हाताला काम नसताना अनेक महिला त्यांच्या घराच्या आधारवड बनल्या.

कोरोना काळात अनेक महिलांनी केक, होम मेड फूड बिझनेस केले. बचतगटाच्या माध्यमातूनही अनेक महिला पुढे आल्या. त्यांनी केलेल्या कामातून अनेक उद्योग उभे राहिले. महिलांनी केलेल्या कामामुळे अनेकींच्या संसाराला हातभार लागला. लॉकडाऊन नंतर काही बिझनेस तसेच राहीले तर काही महिलांनी बंद केले.  

पण आजही अशा महिला आहेत. ज्या घर जबाबदारीमुळे बाहेर पडून काम करू शकत नाहीत. अशा महिलांसाठी आज आपण काही बिझनेस आयडिया पाहणार आहोत जे घरी बसून होऊ शकतात. अन् ज्यामध्ये भांडवलही कमी लागेल पण फायदा भरपूर होणार आहे.

होम मेड बिर्याणी

आजकाल हॉटेलमधून पार्सल घेऊन बिर्याणीवर ताव मारणारे अनेक खवय्ये आहेत. पण सगळ्यांचीच एक तक्रार असते की हॉटेलची बिर्याणी पुरवठी पडत नाही. म्हणजेच, त्यामुळेच होम मेड बिर्याणी जी कमी दरात अन् भरपूर असते. त्यामुळे घरगुती बिझनेसला मोठा स्कोप आहे. तुम्हीही या बिझनेसचा नक्कीच विचार करू शकता.

मटण-चिकन रस्सा बिझनेस

आजकाल अनेकांना केवळ मटण,चिकन सुक्क अन् रस्सा खायला आवडतो. काही मित्रमंडळी एकत्र जमून रस्सा पार्टी करतात. ते घरातून येताना भाकरी चपाती, भात आणतात अन् विकतचा सुक्क रस्सा घेतात. अशा पार्टीवेळी घरगुती पद्धतीने बनवलेलं मटण, चिकन, रस्सा आवडीने खाल्ला जातो.

माशांना वेगळीच डिंमांड

तुम्हाला कोकणी पदार्थ स्पेशली मासे फ्राय, माशांच कालवण लय भारी जमत असेल. तर, तुमच्या व्यवसायात तुमचा हात कोणीही धरू शकत नाही. कारण आजकाल कोकणी पदार्थांची चव प्रत्येकाच्या हातात उतरत नाही. त्यासाठी कमालीचा मुरलेला हात लागतो. नव्याने व्यवसाय करणाऱ्या लोकांना ते जमत नाही. त्यामुळे मासे फ्राय, कालवण यांचाही बिझनेस तेजीत चालणारा आहे.

हे पर्यायही आहेत भन्नाट

केवळ पारंपरीक पद्धतीने बनणारे पदार्थच नाहीतर, सध्या व्हेज नॉनव्हेज मोमोज, चायनिज फूड, दही धपाटे या अशाही पदार्थांची तुम्ही निवड करू शकता. ज्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या ऑर्डर मिळू शकतात.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT